एक्स्प्लोर

Shahrukh Pathan Attacked: स्वतवर हल्ला करण्यासाठी शाहरुखनेच इतर कैद्यांना प्रोत्साहीत केले?

कारागृहातील घटनेद्वारे शाहरुख समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वेगळे बराक मिळविण्यासाठी शाहरुख हा मुद्दाम मारामारी करत असल्याची चर्चा आहे.

मुंबईः नुपूर शर्माच्या वादग्रस्त व्हिडीओला समर्थन देणाऱ्या अमरावती येथील औषध व्यापारी उमेश कोल्हे यांची अमरावतीत हत्या करण्यात आली होती. या हत्येतील आरोपी शाहरुख पठान हा मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात असून त्याच्यावर इतर कैद्यांनी चांगलाच हल्ला चढवला होता. यामध्ये आता नवीन माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे स्वतः शाहरुखनेच इतर कैद्यांना स्वतःवर हल्ला करण्यासाठी प्रोत्साहीत केल्याची माहिती आहे. या प्रकरणी एनएम जोशी रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे एकाच बराकमध्ये राहणाऱ्या आरोपींनी शाहरुखवर हल्ला करत त्याला मारहाण केली होती. या घटनेनंतर सर्व कैद्यांना वेगवेगळ्या बारकमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. कोल्हे हत्याकांड प्रकरणात एनआयएने 7 लोकांना अटक केली असून सर्व आरोपी आर्थर रोड कारागृहात बंदीस्त आहेत. उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपी ऑर्थर रोड कारागृहात बराक क्रमांक 7 मध्ये बंद आहेत. नुपूर शर्मा हिच्या पोस्टला समर्थन केल्याप्रकरणी या आरोपींकडून कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेबद्दल जेव्हा शाहरुखने इतर कैद्यांना सांगितले तेव्हा कल्पेश पटेल, हेमंत मनेरिया, अरविंद यादव, श्रावण आवड आणि संदीप जाधव यांनी शाहरुख पठान वर हल्ला चढवला. घटनेनंतर कारागृह प्रशासनाने सर्व कैद्यांना वेगवेगळ्या बराकमध्ये स्थलांतरीत केले.

कारागृहात शाहरुखचे षडयंत्र!

कारागृहातील हल्ल्यानंतर पोलिसांनी शाहरुखने दिलेल्या कारणांची फेरतपासणी सुरु केली. यात वेगळीच माहिती समोर येत असून कारागृहातील घटनेद्वारे शाहरुखला समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वेगळे बराक मिळविण्यासाठी शाहरुख हा मुद्दाम मारामारी करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलीस सर्व बाजूंनी घटनेचा तपास करत आहे.

Shahrukh Pathan Attacked: उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपीवर कारागृहात जीवघेणा हल्ला

हल्लेखोरांवर गुन्हे दाखल

मुंबई पोलिसांनी भादंवी कलम 149, 143, 146, 323 अंतर्गत पाचही कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारागृहात झालेल्या मारहाणीनंतर शाहरुखला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेसंदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, बेलतरोडीमध्ये खळबळ
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, नागपूरच्या बेलतरोडीमध्ये खळबळ
Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: ठाकरे गटाच्या विभागप्रमुखांना 5 जणांनी संपवलं; प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूने खळबळ, ठाण्यात नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाच्या विभागप्रमुखांना 5 जणांनी संपवलं; प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूने खळबळ, ठाण्यात नेमकं काय घडलं?
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, बेलतरोडीमध्ये खळबळ
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, नागपूरच्या बेलतरोडीमध्ये खळबळ
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
Embed widget