Crime News : 17 वर्षीय मुलीवर घरात घुसून शिक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नराधम शिक्षकाने 17 वर्षीय मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर तिची हत्या केली. मृतदेह पाण्याच्या टाकीत लपवला. ही धक्कादायक घटना राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तात्काळ तपासही सुरु केला आहे.
शिक्षकाचं घृणास्पद कृत्य -
राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात एका शिक्षकाने शाळेत शिकणाऱ्या मुलीसोबत घरात घूसून अत्याचार केला. त्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी त्याने मुलीचा जीव घेतला. कुणालाही समजू नये म्हणून त्यानं मृतदेहाला पाण्याच्या टाकीत फेकले. ही सर्व घटना घडली तेव्हा मुलीच्या घरचे घराबाहेर होते. ते घरी परतल्यानंतर मुलगी घरात दिसली नाही. त्यांनी शोधाशोध सुरु केली. त्यावेळी मुलाचा मृतदेह मिळाला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह त्यांनी पोस्टमार्टमसाठी पाठवला. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली.
मध्यरात्री घरात घुसला अन्
प्राथमिक तपासानुसार, मुलगी ज्या ठिकाणी शिकत होती, त्या शाळेतील शिक्षक त्या मुलीचा पाठलाग करायचा. आरोपीचं नाव प्रल्हादराम आहे. त्याला मुलीच्या घरी कुणी नसल्याचं समजलं होतं. मुलीच्या घरचे लग्नासाठी बाहेरगावी गेले आहेत. नराधम शिक्षकाने याच संधीचा फायदा घेतला. घरात कुणीच नाही, हे ओळखून त्याने मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर तिची हत्या केली अन् मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकला. बाखासर पुलिस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली. शनिवारी मध्यरात्री 12 वाजता ही धक्कादायक घटना घडली. प्रल्हाद मुलीच्या घरात घुसला त्यानंतर अत्याचार केला. कुणाला सांगितलं तर जिवे मारु अशी धमकी दिली. मुलीकडून त्याला विरोध करण्यात आला. त्यानंतर त्याने मुलीला संपवलं. त्यानंतर मृतदेह पाण्यचा टाकीत फेकला अन् पसार झाला.
सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या -
पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रल्हाद गावातील सरकारी शाळेत कार्यकरत होता. तो हिंदी विषय शिकवतोय. त्याचं वर्तन व्यवस्थित नव्हतं. तो मुलींसोबत वारंवार छेडछाड करायचा. त्याशिवाय शारीरिक संबंध करण्यासाठी मुलींवर दबाव टाकत होता. हत्या झालेल्या मुलीसोबतही त्याने छेडछाड केली होती. मुलीने त्याला अनेकदा इग्नोर केले. मुलीने शिक्षकाबद्दल कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर पंचायत बोलवण्यात आली. त्यावेळी आरोपीला समजावून सोडण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या मनात राग वाढला. त्याने शनिवारी संधी पाहून मुलीवर अत्याचार केले अन् त्यानंतर खून केला. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रल्हादवर 376, 302, 326, 450 कलमांअतर्गत गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी फरार आरोपीला सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत.