Satara Crime News सातारा: साताऱ्यातील कराडमधील एक धक्कादायक घटना समोर आली होती. कराडमधील दोन नामांकित डॉक्टर महिलांचे एआयच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ बनवल्याचा प्रकार समोर आला होता. पंजाब राज्यातून व्हिडीओ बनवून घेण्यासाठी कराडमधील डॉ. राजेश शिंदे याने पैसे दिल्याचे संशयिताकडून पोलिसांना सांगितले आहे.
कराड शहरातील डॉ. राजेश शिंदे यांच्या सांगण्यावरून पंजाबमधील विकास शर्मा यांने हे अश्लील व्हिडीओ बनवले. याप्रकरणी आता दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. विकास शर्माला पैशांची गरज असल्याने डॉ. राजेश शिंदे यांनी अश्लील व्हिडीओ बनविण्याचा टास्क दिला होता. विकास शर्मा आणि डॉ. राजेश शिंदे कॉलेजमधील मित्र होते. या टास्कमध्ये महिला डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ती महिला आणि एका सामाजिक कार्यकर्ता यांचे फोटो वापरून अश्लील व्हिडीओ बनविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पंजाब राज्यातून व्हिडीओ बनवून घेण्यासाठी कराडमधील डॉ. राजेश शिंदे याने पैसे दिल्याचे संशयिताकडून पोलिसांना सांगितले आहे. त्याचबरोबर संबंधिताचे काही साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
कराडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कराडमधील दोन नामांकित महिला डॉक्टरांचे AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. महत्वाचं म्हणजे हे व्हिडिओ परराज्यातून तयार करण्यात आले असून, ते बनावट असल्याचे आणि एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
व्हिडीओमध्ये काय?
व्हिडीओमध्ये संबंधित महिला डॉक्टर दोन युवकांसोबत अश्लील चाळे करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हे प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होऊ नयेत म्हणून संबंधित डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयाच्या आधारे कराडमधीलच एका डॉक्टरसह दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून, या घटनेचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर असल्याचे सांगत होता, अशी माहितीही समोर आली आहे. पोलिसांनी याबाबत अधिकृतरित्या सांगितले की, चौकशीदरम्यान अनेक तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत.