Horoscope Today 12 June 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 12 जून 2025, आजचा वार गुरुवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

प्रकृती स्वास्थ टिकवण्यासाठी मूळ विचारात बदल करावा लागेल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

मनातील ताण दडपणाचे प्रतिसाद शरीरावर उमटल्या वाचून राहणार नाही.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

महिलांनी व्यापक विचार करणे गरजेचे ठरेल करावे तसे भरावे या म्हणीचा प्रत्यय येईल.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

पूर्वीचे पेरले आहे ते नक्की सुगवणार आहे त्याबरोबर ईश्वराचे स्मरण करायला विसरू नका म्हणजे सर्व गोष्टी सुसह्य होतील.

सिंह रास (Leo Horoscope Today)

वैवाहिक जीवनात थोड्या कारणावरून वाद संबोधतात अशावेळी सामंजस्याचे धोरण ठेवणे आवश्यक ठरेल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

धंद्यामध्ये पार्टनरशिप असेल तर पार्टनरच्या थोड्या लहरी स्वभावाला तोंड द्यावे लागेल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

वेळेचे गणित प्रयत्नपूर्वक बसवावे लागेल त्यामुळेच घरी आणि बाहेर सर्वांनाच वेळ देऊ शकणार आहात. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल महिलांना संततीशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे लागतील. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

प्रवासाला जायचे योग आले तरी प्रकृतीसह सर्व गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

आर्थिक गुंतवणूक करण्याचे निर्णय घाई घाईने न घेता तज्ञांचा सल्ला घेणे हितावह ठरेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

मित्रमंडळींच्या भेटीसाठी होतील आणि पैसाही खर्च होईल.

मीन रास (Pisces Horoscope Today)

पूर्वी केलेल्या कष्टाचे चीज होईल आणि प्रसिद्धी मिळण्याच्या संधी चालून येतील.

हेही वाचा :                          

Lucky Zodiac Sign : 12 जूनचा दिवस 'या' 5 राशींसाठी 'पॉवरफुल'; घरात चालून येणार पैसा, मालामाल होण्याची सुवर्णसंधी

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)