Navi Mumbai Crime News नवी मुंबई: नवी मुंबईमधील कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये पतीने पत्नीची हत्या (Navi Mumbai Crime News) करून स्वतः वर वार केल्याची घटना घडली आहे. गणेश शिरसाट याने चरित्र्याचा संशय घेत पत्नी गौरी शिरसाट हिच्यावर चाकूने वार केले आहेत. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला असून जखमी पतीवर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी पतीने मुलांच्या समोरच पत्नीची हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.   

खारघरमधील दुहेरी हत्येची घटना ताजी असतानाच कोपरखैरणेत पतीने आपल्या पत्नीचा निघृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने आपल्या मतिमंद मुलांच्या समोर पत्नीच डोक भिंतीवर आपटून तसेच चाकूने 10 ते 15 वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आरोपी पती गणेश शिरसाट याने स्वतः आपला हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपी गणेश शिरसाट हा बायकोवर चरित्र्यावरून संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीला उपचारासाठी जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये पतीने पत्नीची हत्या करून स्वतः वर वार केल्याची घटना घडली आहे. गणेश शिरसाट याने चरित्र्याचा संशय घेत पत्नी गौरी शिरसाट हिच्यावर चाकूने वार केले आहेत. पतीने दोन लहान मुलांच्या डोळ्यादेखत हत्या करुन स्वत:चा हात कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला असून जखमी पतीवर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पत्नी झोपेत असताना पत्नीचा खून केल्याचे चौकशीत समोर आले आहे. दोघांना 8 आणि 2 वर्षांची दोन मुले असून आठ वर्षांचा मुलगा दिव्यांग आहे. 

सांगलीत पत्नीने पतीला संपवलं-

सांगली जिल्ह्यातील कुपवाडमधील प्रकाशनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अनिल लोखंडे या व्यक्तीला त्याच्या पत्नीनं संपवलं आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास कौटुंबिक कारणावरुन वाद झाल्यानं पत्नी राधिका हिनं पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार केला. यामध्ये अनिल लोखंडे याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं असून या घटनेचं नेमकं कारणं अद्याप समोर आलं नाही. कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी या घटनेची माहिती दिली.

 

संबंधित बातमी:

Sangli Crime : 7 जन्म नव्हे, लग्नाच्या 17 दिवसात बिनसलं, वटपौर्णिमेच्या रात्री नवऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालून संपवलं!