एक्स्प्लोर

Santosh Deshmukh case: संतोष देशमुखांनी घरातील मुंग्यांवर पावडर टाकून दिली नाही चिकटपट्टी लावली, वैभवीने सांगितला 'तो' किस्सा

Santosh Deshmukh Murder case: संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

बारामती: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याच्या सहकाऱ्यांना फाशी व्हावी, या मागणीसाठी रविवारी बारामतीमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder case) यांची कन्या वैभवी देशमुख उपस्थित होती. यावेळी वैभवी देशमुख ही भावूक झाली होती. माझ्या बाबांचा गुन्हा काय होता, असा सवाल वैभवीने उपस्थितांना विचारला. 

यावेळी वैभवी देशमुख हिने तिचे वडील किती संवेदनशील आणि हळव्या मनाचे होते, याबद्दलचा एक किस्सा सांगितला. वैभवी म्हणाली की, आमचं घर माळकऱ्यांचं आहे. एकदा आमच्या घरात मुंग्या झाल्या होत्या. मात्र, माझ्या वडिलांनी माझ्या आईला त्या मुंग्यांवर पावडर टाकून दिली नाही. भिंतीवर चिकटपट्टी लावून त्यांनी मुंग्या खाली येण्यापासून थांबवल्या. एवढ्या संवेदनशील मनाचे माझे वडील होते, असे वैभवी देशमुख हिने भावूक होत सांगितले.

मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे न्यायची भीक मागत आहे. 28 मे 2024 रोजी या घटनेची सुरुवात झाली. सुरुवातीला आवादा कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे अपहरण झाले. कंपनीने 29 मे रोजी गुन्हा दाखल केला. या अधिकाऱ्याचे अपहरण दोघांनी केले होते. मात्र, पोलिसांनी फक्त एकावरच गुन्हा दाखल केला. पुढे या प्रकरणाचा तपास झाला नाही. त्यामुळे आरोपींना आपल्याला काहीही होणार नाही, असा आत्मविश्वास आला. वाल्मिक कराड यानेच यासंदर्भात पोलिसांना सूचना दिल्या होत्या. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली नाही तर उद्या राज्यात एखाद्याला रस्त्याने जाताना धक्का लागला तरी खून होतील, अशी भीती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली.

धनंजय देशमुख यांचे गंभीर आरोप

संतोष देशमुख हत्याप्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला.  आठ जण आवादा कंपनीत आले होते. परत एकास अमानुषपणे मारण्यास सुरुवात केली. गावातील एकाने संतोष देशमुख यांना फोन केला. तेव्हा ते आवादा कंपनीत भांडण सोडवायला गेले. त्याविरोधात अशोक सोनावणे हा पोलिसात तक्रार देण्यासाठी भीक मागत होता. पण राजकीय पाठबळामुळे सोनावणे याची तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली नाही. आताही बीडमध्ये दहशतीचे वातावरण आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासात अजूनही राजकीय हस्तक्षेप सुरु आहे. मी याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून माहिती देणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.

आणखी वाचा

'तू जास्त बोललास म्हणून मला त्रास होतोय!' धनंजय मुंडे बालाजी तांदळेवर संतापले; अंजली दमानिया यांचे गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
Nandurbar Crime News: नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Embed widget