Sanjay Shirsat: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात पोलिसांनी 26 मे च्या मध्यरात्री उद्योगपतीच्या घरावर दरोडा घालण्याच्या प्रकरणात एका संशयित आरोपीचा एन्काऊंटर केला .छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोड्यातील संशयित आरोपी अमोल खोतकरची बहिण आणि वडिलांनी पोलिसांवर सुपारी घेऊन एन्काऊंटर केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर मोठी खळबळ उडाली . दरम्यान, उद्योगपतीच्या घरावर पडलेल्या दरोड्यामध्ये पोलीसदेखील सहभागी असतात असं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलं होतं .त्यानंतर आज मंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेत शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा केली . वाळूजच्या उद्योगपतीच्या दरोड्या त्या साडेपाच किलो सोन्यापैकी 32 तोळे रिकव्हर झाले, बाकी सोने कुठे गेले असा प्रश्न आहे त्यांनी उपस्थित केला .
काय म्हणाले संजय शिरसाट?
आज मी पोलीस आयुक्तांकडे शहरातील गुन्हेगारीवर बोलण्यासाठी आढावा बैठक घेतली . शहरात जो मोठा दरोडा पडला होता .त्यानंतर एक एन्काऊंटर झालं .यानंतर अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न आहे हे एन्काऊंटर का केलं ? कशामुळे केलं ? या सगळ्या प्रकाराचे तपशील घेतले आहेत .एन्काऊंटर झालेल्या आरोपीवर दहा गुन्ह्यांची नोंद आहे .यातील दुसऱ्या आरोपीवर 11 गुन्ह्यांची नोंद आहे . पोलिसांच्या अंगावर गाडी घालणे हा प्रकार नवीन नाही त्यामुळे त्या संदर्भातल्या गुन्ह्यांची ही नोंद आहे . ज्या दिवशी आरोपीचा एन्काऊंटर झाला त्यावेळी त्याच्यासोबत जो दुसरा आरोपी होता त्याच्या संदर्भातली ही माहिती घेतली आहे असे मंत्री संजय शिरसाट म्हणाले . या संपूर्ण प्रकरणात शंका अशी आहे की दरोड्यातील पाच साडेपाच किलोमधील 32 तोळे रिकव्हर झाले मात्र उर्वरित सोने गेले कुठे ?याविषयी पोलिसांचा तपास सुरू आहे .यात आणखी आरोपी पकडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही . या संपूर्ण विषयाचा तपास करताना कोणताही दबाव आला तर त्याकडे लक्ष देऊ नका अशा सूचना केल्या आहेत .तुमच्या बाजूने नागरिकांना विश्वासार्ह माहिती पोहोचणं गरजेचं आहे .त्या पद्धतीने काम करा यामध्ये सरकारचं पूर्ण सहकार्य तुम्हाला असेल असेही शिरसाट यांनी सांगितलं .
कुठलाही गुन्हेगार रस्त्यावर फिरणार नाही
छत्रपती संभाजीनगर शहरात मागील दोन दिवसा अगोदर अमोल खोतकर या दरोड्यातील संशयित आरोपीचे एन्काऊंटर झाले होते. दरोड्यामध्ये पोलीस देखील सहभागी असतात असं वक्तव्य संजय शिरसाठ यांनी केलं होतं त्यानंतर आज संजय शिरसाट पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना भेटण्यासाठी आले होते. शहरातील वाढती गुन्हेगारी गुन्हेगारी, कोटकर एन्काऊंटर का करावं वाटलं आणि कशासाठी याची माहिती संजय शिरसाट यांनी घेतली. यानंतर कुठलाही गुन्हेगार रस्त्यावर फिरणार नाही, तो जेलमध्ये असेल अशी माहिती संजय शिरसाठ यांनी दिली. एन्काऊंटर झालेल्या गुन्ह्यामध्ये साडेपाच किलो सोन चोरी गेल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यापैकी फक्त काही प्रमाणात सोने जप्त करण्यात आले आहे. बाकी सोनं कुठे गेलं? हा देखील जबाब शिरसाट यांनी आयुक्तांना विचारला, एन्काऊंटर का झाला आणि का करावा लागला हा देखील प्रश्न शिरसाठ यांनी विचारला असून त्यावर योग्य तपास सुरू असल्याचे देखील शिरसाठ यांनी सांगितले.
हेही वाचा: