एक्स्प्लोर

Sanjay Raut : हमाम में सब नंगे… खरातच्या 'हमाम'मध्ये कोण कोण आहेत हे समोर आणा, संजय राऊतांची मागणी

Sanjay Raut On Kharat Case : राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री, त्यांचे वडील हे अशोक खरातचे भक्त होते. महिलांचे शोषण होत असताना आता त्यांनी यावर बोलायला हवं अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.

मुंबई : भोंदू अशोक खरात (Ashok Kharat Case) प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. 'हमाम में सब नंगे' असं म्हणत त्यांनी या प्रकरणात मोठ्या लोकांचा सहभाग असल्याचा दावा केला आहे. खरातने घेतलेली नावे आणि त्याच्याशी संबंधित लोकांची माहिती पोलिसांनी आणि एसआयटीने जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Sanjay Raut On Neelam Gore : नीलम गोरे प्रकरणावर टीका

संजय राऊत म्हणाले की, या प्रकरणात कोणीही लपून राहिलेलं नाही. खरातच्या हमाममध्ये कोण कोण आहे, हे समोर यायला हवं. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आणि त्यांचे वडील या खरातचे भक्त आहेत. आता महिलांवर अत्याचार झाल्याचं समोर आल्यानंतर त्या मंत्र्यांनी यावर भाष्य करणं गरजेचं आहे. 

Sanjay Raut On Deepak Kesarkar : केसरकरांवर प्रतिक्रिया

संजय राऊत यांनी यांनी दीपक केसरकरांबाबत बोलताना थेट भाष्य टाळलं. मात्र या प्रकरणात आता राष्ट्रपतींनी लक्ष द्यावा, कारण राष्ट्रपतीही एक महिला आहेत. महिलांवर अत्याचार होत असताना राष्ट्रपतींनी राज्याच्या राज्यपालांना निर्देश द्यावेत अशी मागणी संजय राऊत यांनी केली. महाराष्ट्रासारख्या राज्यात एवढं मोठं प्रकरण घडलं असून सरकार माहिती दडवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Sanjay Raut On Vijay Wadettiwar : वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

एपस्टीनकडे अनेक बड्या नेत्यांची माहिती होती, त्यामुळे त्याला तुरुंगातच मारलं गेलं. असाच प्रकारची घटना आपल्याकडे घडली असून अशोक खरातकडे बडे राजकारणी, आयएएस, आयपीएस अधिकारी आणि उद्योगपतींची नावे आहेत. त्यामुळे त्याचंही एपस्टीनसारखं होण्याची शक्यता असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर म्हणाले होते. त्यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.

संजंय राऊत म्हणाले की, "मला असं वाटतं की नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरूवातीपासून या प्रकरणात तपासाची जी दिशा पकडली आणि त्या घरात बाबाला अक्षरशः मोडून काढले. त्याच्यामुळे तुरुंगात सुद्धा खरातची विशेष काळजी घेतली जाईल. तुरुंगात त्याच्यावरती हल्ला होणं किंवा मारणं हे सरकारला परवडणार नाही. विजय वडेट्टीवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे काही माहिती असल्याशिवाय ते बोलणार नाहीत."

खरातच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, तो काही राष्ट्रपती नाही. त्याची सुरक्षा ही तुरुंग प्रशासनाची जबाबदारी आहे. कसाबच्या उदाहरणाचा उल्लेख करत त्यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर अनावश्यक चर्चा होऊ नये असं म्हटलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांच्यावरही संजय राऊतांनी टीका केली. ट्रम्प यांना कुणीही मित्र नसून त्यांनी फक्त ‘गुलाम’ नेमले आहेत, असा आरोप करत त्यांनी अमेरिकेत सुरू असलेल्या आंदोलनांचं समर्थन केलं.

ही बातमी वाचा:

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget