संगमनेर : एकीकडे विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) धामधूम सुरु आहे. तर दुसरीकडे संगमनेरमधून (Sangamner Crime News) एक मोठी बातमी समोर येत आहे. संगमनेरमध्ये भरदिवसा गोळीबार करत दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चार ते पाच जणांनी सोनाराच्या दुकानात दरोडा टाकत मोठी लुट केली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील साकुर गावातील सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा टाकण्यात आला. दुचाकीवरून येत चार ते पाच चोरट्यांनी सोनाराच्या दुकानात प्रवेश केला. सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत. या दरोड्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.  


चोरट्यांकडून हवेत गोळीबार


चोरट्यांनी दुकानातील रक्कम लुटून बाहेर पडल्यावर हवेत गोळीबार करत धूम ठोकली आहे. चोरट्यांनी गोळीबार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून चोरट्यांचा कसून तपास केला जात आहे.


संगमनेरमध्ये कुटुंबाला बेदम मारहाण


दरम्यान, कुटुंबीयांकडे बघून शिवीगाळ करणाऱ्या दारूच्या नशेतील तरुण आणि त्याच्या दहा-पंधरा साथीदारांनी एका कुटुंबीयांना मारहाण केल्याचा तसेच हाउसिंग सोसायटीमधील वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्याचा प्रकार गुरुवारी रात्री संगमनेरच्या घुलेवाडी शिवारातील एकता चौकात घडला. योगेश तिवारी यांचा शहरालगतच्या घुलेवाडी येथील एकता चौकातील कांचन कम्फर्टमध्ये कुटुंबीयांसह राहतात. गुरुवारी सकाळी ते त्यांच्या मालकीची कार सर्विसिंगला देण्यासाठी अहिल्यानगर येथे गेले होते. तेथून ते एसटी बसने पत्नी, मावस भाऊ यांच्या समवेत रात्री साडेनऊच्या सुमारास संगमनेरला परतले होते. बस स्टँडवरून पत्नी, मावस भावासह रिक्षातून ते घरी परतत असताना घराजवळ रिक्षातून उतरताना समोर दारू दिलेल्या अवस्थेत असलेल्या तरुणांनी त्यांना शिवीगाळ करून योगेश तिवारी यांच्यासह कुटुंबियांना मारहाण केली. या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


इतर महत्त्वाच्या बातम्या  


निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप


Mumbai Crime: गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह; 7 तुकडे, डोकं, हात-पाय प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरले