मुंबई: राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना मुंबईतून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोराई परिसरात गोणीत भरलेला एका मृतदेह (Dead Body) सापडला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गोराईच्या (Gorai) बाबर पाडा येथे महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाच्या जंगलसदृश भागात हा मृतदेह सापडला. या मृतदेहाचे डोके, हात-पाय, धड वेगवेगळे करण्यात आले होते. मृतदेहाचे एकूण सात तुकडे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे, याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. 


गोराईच्या बाबर पाडा येथील पिक्सी रिसॉर्टला जाणाऱ्या रस्त्यावर शेफाली गावाजवळ मृतदेहाचे तुकडे असलेली ही गोणी सापडली. हा मृतदेह कोणाला सापडू नये म्हणून जंगलातील झुडुपांमध्ये ही गोणी टाकण्यात आली होती. हा मृतदेह कुजल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नागरिकांनी आजुबाजूला शोध घेतला असता दाट झाडीत ही गोणी सापडली. यामध्ये मृतदेह असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी ही गोणी उघडली तेव्हा त्यामध्ये प्लॅस्टिकच्या डब्यात विविध अवयव भरुन ठेवल्याचे आढळून आले. या मृतदेहाचे एकूण सात तुकडे करण्यात आले आहेत. या घटनेमुळे गोराई परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गोराई पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गोणीत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलिस करत आहेत. जेणेकरुन पुढचे धागेदोरे पोलिसांना मिळू शकतील. या व्यक्तीची हत्या कोणी केली असावी, त्याचे कारण काय असावे, या सगळ्याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरु आहे.


पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह


पुण्यात रविवारी  येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह सापडला होता. या मृतदेहाचा काही भाग कुत्र्यांनी खाल्ला होता. न्याती बिल्डिंग समोरील झाडाझुडपात हा मृतदेह सापडला. अनेक दिवसांपासून हा मृतदेह याठिकाणी होता. त्यामुळे कुत्र्यांनी या मृतदेहाचा बरासचा भाग खाल्ला होता.  मृतदेहाच्या कमरेच्या खालील भाग थोडाच शिल्लक होता. मृतदेहाची कवटी आणि वरील भाग कुत्र्यांनी पूर्णपणे खाल्ल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या परिसरात अनेक बेघर लोक झोपतात. त्यापैकी एखाद्या व्यक्तीचा हा मृतदेह असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस सध्या त्यादृष्टीने पुढील तपास करत आहेत.


आणखी वाचा


'तोंडात गोळ्यांचं पाकीट, पावडर कोंबली अन्...', बाल निरीक्षक गृहात विधीसंंघर्ष मुलाकडून एकावर अनैसर्गिक अत्याचार; डोंगरीतील घटना