मुंबई : आम्ही नाती जपली, पण राज ठाकरेंनी रक्ताचं नातं जपलं. आदित्य वरळीतून उभे होते त्यावेळी आपल्या घरातील व्यक्ती उभा आहे असं समजून राज ठाकरेंनी उमेदवार दिला नव्हता. पण अजूनही वेळ गेली नाही असं म्हणत मनसेचे शिवडीतील उमेदवार बाळा नांदगावकरांनी उद्धव ठाकरेंना साद घातल्याचं दिसून आलं. माहीमची उमेदवारी आधी आम्ही जाहीर केली, नंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर केली. उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंसमोर उमेदवार द्यायला नको होतं असंही ते म्हणाले.
बाळा नांदगावकर म्हणाले की, अमित ठाकरे यांच्यासमोर उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिलाच पण शिंदेंनींही दिला. माहिमची आधी आम्ही उमेदवारी जाहीर केली. नंतर त्यांनी केली. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. शेवटी जे काही वैभव, मान-सन्मान आम्हाला मिळाला आहे ते याच ठाकरे कुटुंबामुळे मिळाला आहे. ते जपणं आवश्यक होतं. याबाबत विचार व्हायला हवा होता. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही.
बाळा नांदगावकर म्हणाले की, राज ठाकरे मनातून फार हळवे आहेत.अगदी बाळासाहेबांप्रमाणे ते आहेत. सगळे ठाकरे असेच आहेत. अमित ठाकरे निवडणूक लढवतील याबाबत खरंच कल्पना नव्हती. मात्र पक्षातील नेत्यांनी निवडणूक लढायला हवं असे मत त्यांनी मांडले. त्यानंतर निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरू झाली.
राज ठाकरेंच्या जे पोटात असतं तेच ओटात असतं, ते सडेतोड बोलतात. आम्ही नाती जपली पण त्यांनी खरचं रक्ताचं नातं जपलयं. आदित्य उभा होता तेव्हा ठाकरे घराण्यातला व्यक्ती उभा आहे हे लक्षात घेऊनच त्यांनी उमेदवार दिला नाही. राजकारणाच्या पलिकडचं नातं जपण्याचं काम कायमच त्यांनी केलं.
निवडणुकीच्या निकालानंतर जो सत्तेत बसेल तो आमच्याच पाठिंब्यानेच बसेल असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला.
माहीममध्ये तिरंगी लढत
माहीम विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आहे. मनसेकडून अमित ठाकरे निवडणुकीला उभे असून त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सदा सरवणकर यांनी अखेरपर्यंत त्यांचा अर्ज मागे घेतला नसल्याने ही रंगत तिरंगी होणार आहे.
ही बातमी वाचा: