Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी आज (14 एप्रिल) रविवारी पहाटे गोळीबार केल्याने बाॅलिवुडसह देश विदेशातील चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत सलमान खान आणि त्याचे कुटुंबीय सुरक्षित असले तरी, गेल्या काही वर्षांत मिळालेल्या धमक्यांच्या मालिकेतील ही धक्कादायक घटना असल्याने मुंबई पोलिसांनी सखोल तपास सुरु केला आहे. 


सलमान खानच्या सुरक्षेला कोणता धोका होता?


हेल्मेट घातलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी पहाटे पाचच्या सुमारास सलमान खानच्या घराबाहेर पाच राऊंड फायर केले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.


गेल्या काही वर्षांत अभिनेत्याला इतर कोणत्या धमक्या आल्या?


मार्च 2023 मध्ये सलमानच्या (Salman Khan) व्यवस्थापकाला धमकीचा मेल आला होता. त्यानंतर जेलमधील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार, एक कॅनडास्थित गुंड, बिश्नोईचा जवळचा सहकारी मोहित गर्ग यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. त्यात बिश्नोईने तिहार तुरुंगातून दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ दिला होता. जिथे त्याने सलमानला धमकी दिली होती. मोहित गर्गच्या आयडीवरून आलेल्या ईमेलमध्ये ब्रारला सलमानशी बोलायचे आहे. त्यात बिश्नोईने दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ दिला होता. ईमेलमध्ये म्हटले होते की, जर सलमानला हे प्रकरण बंद करायचे असेल तर त्याने ब्रारशी समोरासमो बोलावे. यावेळी माहिती दिली असून पुढील वेळी परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही मेलमध्ये देण्यात आली होती. 


त्याआधी, जून 2022 मध्ये, वांद्रे बँडस्टँडवर अभिनेत्याचे वडील सलीम खान चालत असलेल्या जागेवर धमकीचे पत्र ठेवण्यात आले होते. त्या धमकीच्या पत्राबाबतही एफआयआर नोंदवण्यात आला होता.


पुढे, पंजाब पोलिसांच्या चौकशीदरम्यान, बिश्नोई टोळीच्या एका सदस्याने सांगितले की, सलमान खानच्या मुंबईहून त्याच्या पनवेल फार्महाऊसकडे जाण्याच्या मार्गावर दोन व्यक्तींनी रेकी केली होती. या कामासाठी दोघांनी एक महिन्यासाठी भाड्याने खोली घेतल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई पोलिसांना मात्र याची पुष्टी करता आली नाही.


अभिनेता लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर का आला?


राजस्थानमध्ये 'हम साथ-साथ है' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 1998 च्या काळवीट हत्येप्रकरणी सलमान खानच्या कथित सहभागामुळे बिश्नोईने यापूर्वी धमकी दिली होती आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. बिश्नोई समाजाने काळवीट  पवित्र मानले आहे. म्हणून, लॉरेन्स बिश्नोईनेदावा केला की तो तेव्हापासून अभिनेत्यावर नाराज आहे. तथापि, तपास संस्थांनी कोणत्याही टोळीप्रमाणे, बिश्नोई देखील बातम्यांमध्ये राहण्यासाठी आणि उच्च-प्रोफाइल लोकांना लक्ष्य करतात.


कोण आहे लॉरेन्स बिश्नोई? (Who is Lawrence Bishnoi)


बिश्नोई 31 वर्षीय हा पंजाबमधील गुंड असून त्याच्यावर खून आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मूसेवालाच्या हत्येनंतर तो अधिक प्रसिद्धीत आला. त्यावेळी हत्येची जबाबदारी स्वीकारली आणि सांगितले की, त्याने बिश्नोईसोबत हल्ल्याची योजना आखली होती, जो त्यावेळी तिहार तुरुंगात होता.


पोलिसांनी सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना केल्या आहेत?


सलमान खानला मिळालेल्या धमक्यांनंतर, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ऑगस्ट 2022 मध्ये अभिनेत्याला स्वसंरक्षणासाठी बंदुक परवाना जारी केला. नोव्हेंबर 2022 मध्ये, महाराष्ट्र सरकारने सलमान खानचा सुरक्षा स्तर X श्रेणीतून Y प्लस श्रेणीमध्ये श्रेणीसुधारित केली आहे. 


 इतर महत्वाच्या बातम्या