एक्स्प्लोर

सैफ आली खान हल्ला प्रकरण! 1600 पानांचे आरोपपत्र दाखल, 35 साक्षीदारांची साक्ष पोलिसांनी जोडली 

अभिनेता सैफ आली खान (Actor Saif Ali Khan) हल्ला प्रकरणात वांद्रे पोलिसांनी आरोपी  विरोधात 1600 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

Actor Saif Ali Khan : अभिनेता सैफ आली खान (Actor Saif Ali Khan) हल्ला प्रकरणात वांद्रे पोलिसांनी आरोपी  विरोधात 1600 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या घटनेशी संबधित 35 साक्षीदारांची साक्ष पोलिसांनी आरोपपत्रात जोडली आहे. या आरोपपत्रात अभिनेता सैफअली खान, अभिनेत्री करिना कपूरसह सैफ अली खानच्या घरात काम करणारी महिला नर्स एरियामा फिलिप्स ऊर्फ लिमा यांचा जबाब महत्वाचा आहे. याशिवाय ओळख परेड अहवाल तसेच विविध न्यायवैद्यक अहवालाचा समावेश या आरोपपत्रात आहे.

आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे पुरावे हा या आरोपपत्राचा भाग

याशिवाय ओळख परेडमध्ये सैफच्या घरातील नर्स एलियामा फिलिप ऊर्फ लिमा व गीता यांनी आरोपीला ओळखले होते. त्याबाबतचाही अहवाल व बोटांच्या ठशांचा अहवाल तसेच सीसीटीव्ही चित्रीकरण व आरोपीचे चेहरा यांची न्यायवैद्यक पडताळणी करण्यात आली होती. त्याचा अहवालही या आरोपपत्राचा भाग आहे. तसेच सीसीटीव्हीतील आरोपी व अटक करण्यात आलेला शरीफुल यांच्या छायाचित्राची पडताळणी करण्यात आली होती. त्यात सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती शरिफुल असल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत 300 सीसीटीव्ही चित्रीकरण पाठवण्यात आले होते. त्यातील 25 सीसीटीव्ही चित्रीकरणाचा अहवाल होकारार्थी आला आहे. आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे पुरावे हा या आरोपपत्राचा भाग आहे. त्यात बांगलादेशी नागरिक असल्याचे ओळखपत्र व चालक परवानाही पुरावा म्हणून आरोपपत्रात सहभागी करण्यात आला आहे.

हल्ल्याच्यावेळी आरोपीच्या हातात चाकू आणि काठी 

दरम्यान, हल्ल्याच्यावेळी आरोपीच्या हातात चाकू आणि काठी होती. तसेच त्याने नर्स फिलीप यांच्याकडे एक कोटी रुपये देण्याची मागणी केली. हल्ल्यात वापरण्यात आलेल्या चाकूचा पंचनामा व इतर गोष्टींचा समावेशही या आरोपपत्रात करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. याशिवाय सीसीटीव्ही चित्रीकरण, मोबाईल लोकेशन असे तांत्रिक पुराव्यावरून शरिफुलच सैफवर हल्ला करणारा व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या घटनेशी संबधित 35 साक्षीदारांची साक्ष पोलिसांनी आरोपपत्रात जोडली आहे. त्यामुळं या साक्षीदारांनी नेमकी काय साक्ष दिले हे पाहणं महत्वाचं ठ
ठरणार आहे. सैफ आली खान (Actor Saif Ali Khan) हल्ला प्रकरणात वांद्रे पोलिसांनी आरोपी  विरोधात 1600 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या घटनेशी संबधित 35 साक्षीदारांची साक्ष पोलिसांनी आरोपपत्रात जोडली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Saif Ali Khan Interview : 'माझ्यावरील जीवघेण्या चाकूहल्ल्याला मीच जबाबदार', चाकूहल्ल्यानंतर प्रथमच सैफ अली खानची सविस्तर मुलाखत

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Police Vijay Koli Death: पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ, कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन् टोकाचं पाऊल उचललं
पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ, कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन् टोकाचं पाऊल उचललं
Pune News: पुण्याच्या घोरपडीत विसर्जन मिरवणुकीत ट्रॉलीखाली आला; चाक छातीवरून गेलं अन्..., 18 वर्षीय हलगी वादकाचा मृत्यू
पुण्याच्या घोरपडीत विसर्जन मिरवणुकीत ट्रॉलीखाली आला; चाक छातीवरून गेलं अन्..., 18 वर्षीय हलगी वादकाचा मृत्यू
Premanand Maharaj Disciple: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
Ahilyanagar Crime News: अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड करणारा 'तो' पत्रकारच अडकला; महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे 1 लाखाची खंडणी मागितली अन्...; नेमकं काय घडलं?
अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड करणारा 'तो' पत्रकारच अडकला; महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे 1 लाखाची खंडणी मागितली अन्...; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Mandir Case: राम मंदिरातील लुटीविरोधात SIT कडून आरोपपत्र दाखल; श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांना 'क्लिनचिट'
राम मंदिरातील लुटीविरोधात SIT कडून आरोपपत्र दाखल; श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांना 'क्लिनचिट'
Vinod Kambli Viral Video: Video: विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल; म्हणाला, 'मला इथं आल्यापासून..'
Video: विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल; म्हणाला, 'मला इथं आल्यापासून..'
Police Vijay Koli Death: पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ, कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन् टोकाचं पाऊल उचललं
पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ, कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन् टोकाचं पाऊल उचललं
Maharashtra Drought: राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळाच्या घोषणेचा जीआर, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळाच्या घोषणेचा जीआर, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
Gyanesh Kumar: 'ज्ञानेश कुमारांना पद्मभूषण किरकोळ गोष्ट, थेट पंतप्रधान केलं पाहिजे..' भाजप प्रदेध्याक्षांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पद्मभूषण मागणीवर कोणी केला हल्लाबोल?
'ज्ञानेश कुमारांना पद्मभूषण किरकोळ गोष्ट, थेट पंतप्रधान केलं पाहिजे..' भाजप प्रदेध्याक्षांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पद्मभूषण मागणीवर कोणी केला हल्लाबोल?
Pune Ganesh Visarjan 2026 : पुण्यातील गणपती मंडळांचा 'हम करे सो कायदा'! रात्री डीजे बंद होताच मिरवणुका जागेवर थांबवल्या, दुसरा दिवस उजाडताच पुन्हा दणदणाट
पुण्यातील गणपती मंडळांचा 'हम करे सो कायदा'! रात्री डीजे बंद होताच मिरवणुका जागेवर थांबवल्या, दुसरा दिवस उजाडताच पुन्हा दणदणाट
Pune Ganeshotsav Visarjan: मिरवणूक विद्यानंद बापटांच्या घराबाहेर येताच डीजेवर नाचणाऱ्यांना चेव चढला, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् वाक्याचा गजर, नेमकं काय घडलं?
मिरवणूक विद्यानंद बापटांच्या घराबाहेर येताच डीजेवर नाचणाऱ्यांना चेव चढला, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् वाक्याचा गजर, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटीतून अवघ्या काही तासात उपोषणाचा मंडप हटवला, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अंतरवाली सराटीतून अवघ्या काही तासात उपोषणाचा मंडप हटवला, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget