एक्स्प्लोर

Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?

Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणातील एसआयटी चौकशीत रुपाली चाकणकर काय काय म्हणाल्या याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) सध्या चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. नाशिकमधील भोंदू अशोक खरातसोबतचे (Ashok Kharat Case) फोटो व्हायरल झाल्यानंतर आधी रुपाली चाकणकरांचं पद गेलं. पुढे पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही त्यांना पायउतार व्हावं लागलं. या दोन धक्क्यांनंतर त्यांच्याभोवती आता चौकशीचा ससेमिरा लागला आहे. काल एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंनी रुपाली चाकणकरांची तब्बल 6 तास चौकशी केली. (Rupali Chakankar SIT Inquiry)

महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका रुपाली चाकणकरांवर आहे. खरातसोबतचे संबंध आणि त्यानंतर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी झाली. दरम्यान या आधीच त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचीही चौकशी करण्यात आली. अशोक खरातने पतसंस्थेत उघडलेल्या बोगस खात्यांच्या प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांची चौकशी झालेली. दरम्यान एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली असून चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचं रुपाली चाकणकरांनी सांगितलं. दरम्यान, एसआयटी चौकशीत रुपाली चाकणकर काय काय म्हणाल्या याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीत काय काय म्हणाल्या? (Rupali Chakankar SIT Inquiry)

माझे कुटुंब वारकरी संप्रदायाचे असून, मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरू मानले होते, असं रुपाली चाकणकर एसआयटीसमोर म्हणाल्या. माझे आणि अशोक खरातचे आर्थिक संबंध नसून खरातकडे जाण्यासाठी मी कुणालाही आग्रह केला नाही, असं रुपाली चाकणकरांनी सांगितले. तसेच अशोक खरात याची दुसरी बाजू मला माहीत नव्हती, असा दावाही रुपाली चाकणकरांनी केला. 

एसआयटीच्या चौकशीनंतर रुपाली चाकणकर काय म्हणाल्या? (Rupali Chakankar SIT Inquiry)

 चौकशीत मी सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तर दिली आहेत. मला विश्वास वाटतो नक्कीच त्यांचं उत्तराने समाधान झालं असेल. पोलिसांना या तपासात जसं माझं सहकार्य हवं असेल ते पूर्णपणे मी सहकार्य करेन. काय प्रश्न विचारले हे अहवालातून तुम्हाला कळेल, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. पोलिसांना जे आवश्यक होतं त्यात मी सर्व सहकार्य केले. तपासात सविस्तर मी तपास यंत्रणासोबत बोलले.  समर्पक उत्तर दिली आहे. चौकशी संदर्भात सविस्तर अहवाल तुमच्यापर्यंत येईल, असं रुपाली चाकणकरांनी सांगितले.

संबंधित बातमी: 

रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी, SP तेजस्वी सातपुतेंनी काय काय विचारल? बाहेर येताच म्हणाल्या, मी पुण्याला निघाले...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 
Ambernath Crime News: मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना
मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना
Ambernath Crime News: दोघांच्या शरीरसंंबंधात लहान मुलाचा अडसर, अंबरनाथमध्ये आईच्या प्रियकराने चिमुरड्याला निर्दयीपणे संपवलं, अन्...
दोघांच्या शरीरसंंबंधात लहान मुलाचा अडसर, अंबरनाथमध्ये आईच्या प्रियकराने चिमुरड्याला निर्दयीपणे संपवलं, अन्...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget