एक्स्प्लोर

रत्नागिरीत एसीबीची मोठी कारवाई, क्लास वन अधिकाऱ्यासह शिपायाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

या घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा लाच प्रकरणात सहभाग असल्याने जनतेत रोष निर्माण झाला आहे.

Ratnagiri Crime: रत्नागिरीत गुरुवारी रात्री (11 सप्टेंबर) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे. स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील वर्ग-1 अधिकारी, जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी आणि एका कंत्राटी शिपायाला 16,500 रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

लेखापरीक्षण अहवालातून मुद्दे वगळण्यासाठी लाच

दापोली पंचायत समितीमध्ये सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून काम करणाऱ्या 55 वर्षीय अधिकाऱ्यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या कार्यालयाचे सन 2020-21 आणि 2021-22 या दोन आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय, रत्नागिरीमार्फत झाले होते. या तपासणीत 21 आक्षेप नोंदवले गेले होते. त्यानंतर तक्रारदार अधिकाऱ्यांनी सर्व मुद्द्यांवर स्पष्टीकरण देऊन 5 ऑगस्ट 2025 रोजी अनुपालन अहवाल सादर केला.

या प्रकरणी अंतिम अहवाल काढून घेण्यासाठी तक्रारदार 5 ऑगस्ट रोजी सहाय्यक संचालक शरद जाधव आणि कंत्राटी शिपाई सतेज घवाळी यांना भेटले. त्या वेळी, सर्व 21 आक्षेप वगळून अंतिम अहवाल तयार करून देण्यासाठी जाधव यांच्या सांगण्यावरून घवाळीने 24,000 रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले.

तीन लोकसेवक एकाचवेळी अटकेत

या कारवाईत स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाचे सहाय्यक संचालक (वर्ग-१) शरद रघुनाथ जाधव, जिल्हा परिषद वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी सिद्धार्थ विजय शेट्ये, आणि कंत्राटी शिपाई सतेज शांताराम घवाळी या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. एकाच वेळी तीन लोकसेवकांना अटक झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

एसीबीची कारवाई

तक्रारदाराने थेट एसीबीकडे धाव घेतली होती. एसीबीने सापळा रचून गुरुवारी रात्री ही कारवाई केली. जाधव, शेट्ये आणि घवाळी या तिघांकडून तक्रारदाराकडून घेतलेले पैसे जप्त करण्यात आले आहेत. आरोपींवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा लाच प्रकरणात सहभाग असल्याने जनतेत रोष निर्माण झाला आहे.

कणकवली हादरली, दारुड्या मुलाने आईच्या डोक्यात कोयता घातला अन् 

दारूच्या नशेमध्ये मुलानेच आपल्या आईचा खून केल्याची घटना कणकवली तालुक्यातील वारगाव, सोरफ-सुतारवाडी येथे रात्रीच्या सुमारास राहत्या घरी घडली. प्रभावती सोरफ या 80 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलगा रवींद्र सोरफ याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पोलिसांकडून गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. या हत्येमुळे (Murder news) कणकवलीत एकच खळबळ उडाली आहे. तसेच वृद्ध महिलेल्या मृत्युविषयी सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Kankavli News)

हेही वाचा 

Dhule Crime: धुळे हादरलं, माजी स्थायी समिती सभापतींच्या मुलानं आयुष्य संपवलं, वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसात...

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 
Ambernath Crime News: मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना
मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना
Ambernath Crime News: दोघांच्या शरीरसंंबंधात लहान मुलाचा अडसर, अंबरनाथमध्ये आईच्या प्रियकराने चिमुरड्याला निर्दयीपणे संपवलं, अन्...
दोघांच्या शरीरसंंबंधात लहान मुलाचा अडसर, अंबरनाथमध्ये आईच्या प्रियकराने चिमुरड्याला निर्दयीपणे संपवलं, अन्...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget