एक्स्प्लोर

प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याला थंड काळजानं संपवलं, राजाच्या पिंडदानानंतर सोनमच्या भावाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, हे नातं आधीच कळलं असतं तर...

Crime news: या हत्येच्या कटात तिचा प्रियकर राज कुशवाहा, तसेच विशाल चौहान, आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत यांचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

Raja Raghuwanshi Murder Case: इंदौरमधील उद्योजक राजा रघुवंशी यांच्या हत्येनं देशभरात खळबळ उडवली आहे. लग्नानंतर केवळ 10 दिवसांत पत्नी सोनम हिनं मेघालयातील हनिमून ट्रिपमध्येच पतीचा काटा काढला. या हत्येप्रकरणी मोठे खुलासे झाले असून, या खुनाचा कट त्यांची पत्नी सोनम रघुवंशी हिने आपल्या प्रियकरासोबत रचल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे, पतीचा जीव घेतल्यानंतर सोनम गाझीपूरमधील एका ढाब्यावर सापडली आणि अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. या प्रकरणात आता तिच्या भावाने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. या प्रकरणात तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि अन्य तिघांना अटक झाली आहे.

दरम्यान, उज्जैनमध्ये राजा यांचं पिंडदान पार पडलं. या विधीला सोनमचा सख्खा भाऊही उपस्थित होता. राजाच्या पिंडदानानंतर सोनमच्या भावाचं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे.  तो म्हणालाय, "हे नातं आधीच कळलं असतं, तर मीच त्यांचं लग्न लावून दिलं असतं… पण आता दोषी आढळली, तर तिला फाशी द्यायला हवी!" (Crime News)

नक्की प्रकरण काय?

राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचं लग्न 11 मे रोजी थाटात पार पडलं. मात्र अवघ्या 10 दिवसांत दोघं हनिमूनसाठी शिलाँगला गेले आणि तिथेच राजा यांचा संशयास्पद मृत्यू झाला. 23 मे रोजी मेघालयातील ईस्ट खासी हिल्स परिसरात राजा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली. तपास करत असतानाच पोलिसांनी सोनमवर संशय घेतला आणि या हत्येच्या कटात तिचा प्रियकर राज कुशवाहा, तसेच विशाल चौहान, आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत यांचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

राजाच्या पिंडदान विधीनंतर सोनमचा भाऊ म्हणाला..

राजा रघुवंशी यांचा पिंडदान विधी शुक्रवारी उज्जैनमधील क्षिप्रा नदीच्या तीरावर त्यांच्या भावंडांनी सचिन आणि विपिन यांनी पार पाडला. विशेष म्हणजे, या विधीला सोनम रघुवंशी हिचा भाऊ गोविंदही उपस्थित होता. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना त्याने सांगितलं, “माझ्या बहिणीचं आणि राजचं नातं मला लग्नाआधी माहीत असतं, तर मीच त्यांचं लग्न लावून दिलं असतं किंवा तिला पळून जाऊ दिलं असतं.” पुढे तो म्हणाला, “आज मी राजा यांच्या कुटुंबासोबत आहे. ते माझ्या भावासारखेच आहेत. सोनम दोषी आढळली, तर तिला फाशी व्हायलाच हवी.”

गोविंदने सोनमविषयी बोलताना तिला “हट्टी आणि चटकन रागावणारी” असं म्हटलं.  “आम्ही तिच्यावर कधीही जबरदस्ती केली नव्हती. तिला जर लग्न नको होतं, तर तिनं स्पष्ट सांगायला हवं होतं. पण तिनं जे केलं, ते माफ करता येण्यासारखं नाही. तिनं केवळ आमचं नव्हे, तर संपूर्ण मध्य प्रदेशाचं नाव खराब केलं आहे.” राजाचा भाऊ विपिननं सांगितलं, “गोविंद आमच्याशी संपर्कात होता. आम्ही त्याला स्पष्ट सांगितलं की, समारंभाला यायचं असेल तर ये. कारण चूक त्याच्या बहिणीची होती.”

हेही वाचा

Pune Crime News: प्रेमाचा त्रिकोण अन् हत्याकांड; प्रेयसीला प्रेमात पाडणाऱ्या तरुणाची हत्या, गुजरातचा प्रियकर थेट पुण्यात आला भेटायलं बोलावलं अन्...

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget