Pune Accident : सकाळी धावणाऱ्या आयटी अभियंत्याला भरधाव कारने उडवलं, कारचालक अल्पवयीन असल्याची चर्चा
Pune Accident : पुण्यात पाषाण-बावधन रस्त्यावर सकाळी धावण्याचा सराव करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर विरेंद्र द्विवेदी यांना भरधाव कारने उडवले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Pune Hit And Run : पुण्यातील पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात एक अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. सकाळी रस्त्यावर धावण्याचा सराव करणाऱ्या विरेंद्र द्विवेदी या 42 वर्षीय आयटी अभियंत्याचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. 19 वर्षीय तरुणाने चालवलेल्या कारने द्विवेदी यांना जोरात धडक दिल्याची माहिती आहे.
अपघाताची ही घटना इतकी भीषण होती की विरेंद्र द्विवेदी गंभीर जखमी झाले. घटनेनंतर ज्या कारने द्विवेदी यांना धडक दिली होती, त्याच कारमधून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर आणि आयटी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Pune Pashan Road Accident : 'या' नावावर नोंदणीकृत अपघातग्रस्त कार
तपासादरम्यान अपघातग्रस्त कारबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अपघातात सहभागी असलेली कार ही 'ब्लूरेज डेव्हलपर्स' (BLUERAYS Developers) या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत आहे. तसेच या गाडीचा अधिकृत पत्ता 'अबिल हाऊस' (ABIL House) येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
Pune Crime News : 19 वर्षांच्या तरुणाकडून अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी कार एक 19 वर्षांचा तरुण चालवत असल्याची माहिती आहे. पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डनजवळ विरेंद्र द्विवेदी हे नेहमीप्रमाणे सकाळी धावण्याचा व्यायाम करत असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात कारचालकही जखमी असल्याची माहिती आहे.
Pune IT Engineer Death : पोलिसांकडून गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. अपघात नेमका कसा घडला आणि कारचा वेग किती होता, याबाबत परिसरातील CCTV फुटेजची तपासणी केली जात आहे. सकाळी व्यायाम करण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ही बातमी वाचा :






















