एक्स्प्लोर

Pune MPSC Student Death : स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रथमेशनं संपवलं जीवन; शेवटची चिट्ठी नाही तर सापडल्या फक्त उसने पैसे घेतल्याच्या नोंदी

Pune MPSC Student Death : परीक्षेतील अपयश, कर्जाचा वाढणारा डोंगर; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेशने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पुणे: स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुण्यात आलेल्या एका उच्चशिक्षित तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवल्याची (Pune MPSC Student Death) सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील प्रथमेश देशमुख (वय २८) असे या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. पुण्यातील शनिवार पेठ परिसरातील एका भाड्याच्या खोलीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या (Pune MPSC Student Death) केली. काही दिवसांपूर्वीच स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत 'लढू आणि जिंकू' असा निर्धार व्यक्त करणाऱ्या प्रथमेशच्या या अचानक एक्झिटमुळे त्याच्या मित्रपरिवारात आणि गावी प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. (Pune MPSC Student Death)

Pune MPSC Student Death : कर्जाचा तगादा अन् नैराश्य

मूळचा खासापुरी (तालुका परंडा, जिल्हा धाराशिव) येथील रहिवासी असलेला प्रथमेश गेल्या तीन वर्षांपासून पुण्यात राहून एमपीएससीची तयारी करत होता. मागील आठ महिन्यांपासून तो शनिवार पेठेतील नंदन सोसायटीमध्ये राहत होता. मंगळवारी रात्री ११ वाजता तो खोलीवर आला होता, मात्र बुधवारी सकाळी तो बेडरूममधील छताच्या लोखंडी हुकाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ससून रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. प्रथमेशच्या वडिलांचे आधीच निधन झाले असून घरी त्याची आई एकटीच आहे, तर त्याला चार विवाहित बहिणी आहेत. घरची अत्यंत बिकट परिस्थिती, स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने आलेले अपयश आणि डोक्यावर वाढणारा कर्जाचा डोंगर या तणावातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे.

Pune MPSC Student Death : खोलीत सापडली देण्याघेण्याची माहिती

पोलिसांना घटनास्थळाची पाहणी करताना कोणतीही 'सुसाईड नोट' सापडलेली नाही. मात्र, दोन पानांवर प्रथमेशने लिहिलेला जमा-खर्चाचा आणि कर्जाचा हिशोब पोलिसांच्या हाती लागला आहे. यामध्ये त्याने सुमारे १८ ते १९ जणांकडून घेतलेल्या अडीच लाख रुपयांच्या कर्जाची नोंद केली होती. ज्यांचे पैसे त्याने परत केले होते, त्यांच्या नावापुढे त्याने 'टिक मार्क' करून ठेवले होते. यावरून कर्जाचा वाढत चाललेला तगादा आणि आर्थिक विवंचनेतून आलेल्या मानसिक तणावामुळेच त्याने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज विश्रामबाग पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Pune MPSC Student Death : १८ ते १९ जणांकडून घेतलेल्या पैशांचा उल्लेख

प्रथमेशने दोन पानी चिठ्ठी मागे ठेवली आहे. त्यात त्याने १८ ते १९ जणांकडून घेतलेल्या पैशांचा उल्लेख केला आहे. सुमारे अडीच लाखांचे कर्ज असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेप्रकरणी माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "प्रथमेश मागील काही वर्षांपासून शनिवार पेठ परिसरात राहून एमपीएससीचा अभ्यास करत होता. परीक्षांमध्ये वारंवार आलेले अपयश आणि कर्जाचा मोठा ताण या मानसिक दडपणाखाली (स्ट्रेस) त्याने आत्महत्या केल्याचे तपासातून समोर आले आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन (मेडिकल) पूर्ण झाले असून मृतदेह त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला आहे."

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CP On Mandar Kiwale Case: मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
Jalgaon Boat Accident: जळगाव जिल्ह्यातील गोगडी धरणात बोट मध्यभागी आली अन् तोल जाऊन उलटली; चालकासह तिघा भावंडांचा तासभर मृत्यूशी संघर्ष, दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
जळगाव जिल्ह्यातील गोगडी धरणात बोट मध्यभागी आली अन् तोल जाऊन उलटली; चालकासह तिघा भावंडांचा तासभर मृत्यूशी संघर्ष, दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
Mandar Kiwale Case : शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबारासह कोयत्याने हल्ला; दोन्ही हातांचे पंजे तोडले; भावाचा बदला घेतला, पाळत ठेवली अन् गेम केला, मंदार किवळे प्रकरणात आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबारासह कोयत्याने हल्ला; दोन्ही हातांचे पंजे तोडले; भावाचा बदला घेतला, पाळत ठेवली अन् गेम केला, मंदार किवळे प्रकरणात आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
CP On Mandar Kiwale Case: मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
Sharad Pawar Health: शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
Mumbai Mahim Firing Case: माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
Rajgurunagar Accident CCTV: राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget