पुणे : शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी अजून अटकेत असतानाच पुण्यात पुन्हा एकदा हाय प्रोफाईल कार अपघाताची (Accident) घटना घडली आहे. यावेळी, आमदाराच्या पुतण्यानेच बेदरकारपणे गाडी चालवून दुचाकीवरील दोघांना उडवल्याची माहिती आहे.  पुणे-नाशिक महामार्गावरीस कळंब येथे दुचाकी आणि कारचा हा भीषण अपघात झाला. पुण्यातील खेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) पाटील यांचा पुतण्या मयुर मोहिते (Mayur Mohite) यानं आपल्या चारचाकी गाडीनं दोघांना उडवलं. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 304 अंतर्गत गुन्हा (Crime news) दाखल झाला, तरीही पोलीस कोठडी न मिळाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. 


पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडले, त्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पोर्शे कार अपघाताची आठवण पुणेकरांना झाली. कारण,  अपघाताची घटना घडल्यापासून मंचर पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेतला जात होता. अखेर आमदार पुतणे मयूर मोहितेची पोलीस कोठडी मिळविण्यात मंचर पोलीस अपयशी ठरल्याने, त्यावर शिक्कामोर्तब झाला. घोडेगाव न्यायालयाने मयुरची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यानं अपघातानंतर काही तासांतच मयुरच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलिसांनी कठोर कलमं लावून, न्यायालायत भक्कम बाजू मांडली असती तर नक्कीच मयुरला पोलीस कोठडी मिळाली असती. मात्र, सुरुवातीपासून पोलीस दबावाखाली काम करत असल्याचं आणि निःपक्षपातीपणे कारवाई करत नसल्याचं बोललं जात होतं. त्यावर, न्यायालयाने गंभीर गुन्ह्यातही आरोपीला थेट न्यायालयाीन कोठडी सुनावल्याने आता पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेवर शिक्कामोर्तब झालाय, असं म्हणायला वाव आहे.


पुतण्याने मद्यपान केलं नाही


पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्यानं आपल्या कारनं दोघांना चिरडलं. आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. मेडिकल रिपोर्टमध्ये नेमकं काय आढळतं याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अपघातानंतर मयूर मोहिते पाटील गाडीतच बसून राहिला, तो गाडीबाहेर आलाच नाही, असं स्थानिकांनी सांगितलं आहे. यासर्व चर्चांवर आमदार दिलीप मोहिते पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही, त्यानं मद्यपानही केलेलं नव्हतं, असा दावा आमदार दिलीप मोहितेंनी केला आहे. 


हेही वाचा


Pune Drugs Video : पुण्यात ड्रग्जवरुन पुन्हा राडा, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, शंभूराज देसाईंकडून प्रत्युत्तर 


संतापजनक! पुण्यात 13 वर्षीय मुलीवर वडील, काका अन् चुलत भावाकडून बलात्कार