Pune Latest Crime News Update : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात लाजीरवाणी घटना (Pune Crime News) घडली आहे. लग्नात हुंडा दिला नाही म्हणून महिलेचा मानसिक छळ केला जात होता. त्यामुळे हताश झालेल्या 21 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रुकय्या शहनवाज शेख असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पुण्यातील दत्तवाडी मधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये (Pune Dattawadi Police Station) तक्रार दाखल झाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पुण्यातील दत्तवाडी परिसरात 21 वर्षीय महिलेनं आत्महत्या केली आहे. लग्नात हुंडा दिला नाही म्हणून सासरच्या मंडळीकडून दररोज मानसिक छळ केला जात होता, त्यामुळे हताश झालेल्या विवाहित महिलेनं गळफास घेत आत्महत्या केली. रुकय्या शहनवाज शेख असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या संदर्भात रुकय्या चे वडील अल्ताफ अन्सारी यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रुकय्याचे पती आणि सासू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
9 महिन्यांपूर्वी रुकय्या आणि तिचे पती यांचा विवाह झाला होता. विवाहच्या काहीच दिवसात रुकय्याचा पती आणि सासू यांनी तिला हुंडा दिला नाही म्हणून मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. लग्नामध्ये तिच्या माहेरच्या लोकांनी हुंडा दिला नाही, या गोष्टीवरून तिला अनेक वेळा हिणवले जात होते. तसेच तिचा वारंवार मानसिक छळ केला जात होता. लग्नात दिलेल्या भेट वस्तू या भेट वस्तू नसून त्या भिक घातल्या आहेत, असे म्हणून रुकय्या यांना पती आणि सासू यांनी मिळून अनेक वेळा घालून पाडून बोलले जात होते. तसेच तिचा वारंवार मानसिक छळ केला जायचा. या सर्व जाचाला कंटाळून रुकय्याने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
21 वर्षीय रुकय्या हिच्या वडिलांनी याप्रकरणी दत्तवाडी पोलीस तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली. रुकय्याचे पती शहानवाज कासिम शेख याला पोलिसांनी अटक केली असून तिची सासू राजमा शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तवाडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 21 वर्षीय महिलेला सासरच्या जाचाला कंटाळून जीव द्यावा लागला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.