IPL 2023 New season : आयपीएलचा आगामी हंगाम अर्थात 16 वा सीझन आयपीएलच्या इतर सीझनपेक्षा खूप वेगळा असणार आहे. आयपीएल 2023 मध्ये अनेक नवीन नियम समाविष्ट केले जात आहेत, ज्यामुळे या स्पर्धेची उत्सुकता पूर्वीपेक्षा अधिक वाढणार आहे. या वर्षी, दर्शकांना आयपीएल फॉरमॅटपासून ते डीआरएस सिस्टमपर्यंत प्रत्येक गोष्टीत बदल पाहायला मिळतील. चला तर या नवीन नियमांबद्दल जाणून घेऊ...


आयपीएल 2023 फॉरमॅट



  • आयपीएलच्या 10 संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे.

  • गट निश्चित करण्यासाठी ड्रॉचा वापर केला गेला, ज्याने निर्धारित केले की दोन गटांपैकी कोणता संघ कोणत्या संघाविरुद्ध एकदा आणि कोणाविरुद्ध दोनदा खेळेल.

  • गट टप्प्यात, प्रत्येक संघ त्याच्या गटातील इतर चार संघांशी दोनदा खेळेल (एक होमग्राऊंड आणि एक अवेग्राऊंडवर खेळेल), इतर गटातील चार संघ प्रत्येकी एकदा आणि उर्वरित संघ 2 सामन्यात खेळतील. अशा प्रकारे प्रत्येक संघ 14 सामने खेळेल.

  • आयपीएल पॉईंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर विजेत्या संघाला 2 गुण मिळतील. पराभूत संघाला एकही गुण मिळणार नाही आणि नंतर सामना अनिर्णित राहिला किंवा निकाल लागला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल.
    प्लेऑफ गटाचे सामने पूर्वी जसे होत होते त्याच पद्धतीने होतील.


आयपीएल 2023 नवीन नियम


बीसीसीआयने या आयपीएल हंगामात काही नवीन नियम केले आहेत. या नियमामुळे संघाच्या पराभव आणि विजयात मोठा फरक पडू शकतो. या नवीन नियमानुसार, नाणेफेकीच्या वेळी संघाला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनसह 4 पर्यायी खेळाडूंची नावे द्यावी लागतील. त्या 4 खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूचा कर्णधार सामन्यादरम्यान स्पेशल खेळाडू म्हणून वापर करू शकतो. ज्याला 'इम्पॅक्ट प्लेअर' असं म्हटलं जात असून हा खेळाडू म्हणून, कर्णधार 4 पर्यायी खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधील कोणत्याही एका खेळाडूसह बदलू शकतो. रिटायर्ड हर्ट प्लेअरच्या जागी 'इम्पॅक्ट प्लेअर'ही बॅटिंगला येऊ शकतो. दोन्ही संघ प्रत्येक सामन्यात इम्पॅक्ट खेळाडू वापरू शकतात. जर संघात 4 परदेशी खेळाडू खेळत असतील, तर विदेशी खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करता येणार नाही.


IPL 2023 च्या प्रत्येक डावात दोन DRS 



  • आयपीएलमध्ये खेळाडूंना वाइड आणि नो-बॉलचाही रिव्ह्यू घेता येणार आहे.

  • महिला प्रीमियर लीग ही अशी पहिलीच स्पर्धा आहे, ज्यामध्ये प्रथमच वाईड आणि नो बॉलसाठी डीआरएस घेण्याची व्यवस्था आली आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सची हरमनप्रीत कौर हा नवा नियम वापरणारी पहिली खेळाडू ठरली आहे.

  • झेल बाद झाल्यावर, फलंदाज अर्धी खेळपट्टी ओलांडली की नाही, नवीन फलंदाज स्ट्राइक घेतील. शेवटचा चेंडू असेल तर तो स्ट्राइक घेणार नाही.


हे देखील वाचा-