पुणे : पुणे L3 बार ड्रग्सप्रकरणातील आरोपींना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणातील आठ आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत हा निर्णय दिला आहे. पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं, त्यानंतर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. 


आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी


पोलिसांनी आठ आरोपींना न्यायालयाता हजर करताना कोर्टाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना कोठडी सुनावली आहे. L3 मध्ये झालेल्या पार्टीची माहिती समोर आल्यानंतर पुण्याचं ड्रग्स कनेक्शन उघड झालं आहे. L3 मध्ये झालेल्या पार्टीमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश होता का, याचा तपास सध्या सुरु आहे. 


तरुणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले


सोशल मीडियाद्वारे पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. L3 बारचं बिल ऑनलाईन पद्धतीने भरलं गेलं आहे. अंमली पदार्थ सेवन केलेल्या तरुणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या तरुणांना सुद्धा याच आरोपींना त्या बारमध्ये बोलावले होतं. यातील दोन आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली. याप्रकरणी सचिन कामठे या तरुणाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.


L3 बार पार्टी प्रकरणी आठ जणांना अटक


पुणे L3 बार पार्टी प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या आठ जणांना आज पोलीस कोर्टात करण्यात आलं. आरोपींनी पुणे सत्र न्यायालयात हजर केलं गेलं. पुण्यातील एफसी रोडवर असलेल्या  L3 बारमध्ये ड्रग्स पार्टी झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी संतोष कामठे, सचिन कामठे, उत्कर्ष देशमाने, योगेंद्र गिरासे, रवी माहेश्वरी, अक्षय कामठे, रोहन गायकवाड, दिनेश मानकर यांना कोर्टात हजर करण्यात आलं.


ड्रग्स पार्टीतील व्हिडीओ व्हायरल


पुण्यातील L3 बारमधील आणखी दोन व्हिडीओ समोर आले आहेत. ड्रग्स पार्टीचे आणखी काही व्हिडिओ समोर आले आहेत. रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पार्टी सुरु होती. 40 ते 50 जणांची पुण्यातील एफसी रोड असलेल्या L3 बार मधील पार्टीचे व्हिडीओ समोर आले. हातात मद्याचे ग्लास, डीजेचा मोठा दणदणाट तरुणाईकडून सुरू असल्याचे बारमधील व्हिडीओ सापडले आहेत.