पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यंदाच्या आषाढी वारीत (Ashadhi Wari) सहभागी होणार आहेत. शरद पवार हे 7 जुलैला तुकोबांच्या पालखीत वारकऱ्यांसोबत (Ashadhi Wari) चालणार आहे.  तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यात (Tukaram Maharaj Palkhi)  शरद पवार बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत (Baramti To Sansar)  पायी चालत सहभागी होणार आहे.  या पायी वारीत नातू युगेंद्र पवार (Yugendra Pawar)  आणि लेक सुप्रिया सुळेदेखील (Supriya Sule)  सहभागी होणार आहे. 


 पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम राबविला जातो. साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यंदा शरद पवार या वारीत सहभागी होणार आहेत. 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम गेली दहा वर्षे राबविला जात आहे. यंदाचे अकरावे वर्ष  आहेय  यंदा  संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात 7 जुलै रोजी शरद पवार  बारामती ते सणसर हे अंतर चालणार आहेत. 


शरद पवार पहिल्यांदाच होणार सहभागी


वारीतील विचार, शिस्त, बंधूभाव, समता हा विचार ही मंडळी  'एक दिवस तरी वारी अनुभवावी' यात सहभागी होऊन दिवसभर चालून समजून घेतात. या दरम्यान दुपारच्या विसाव्यापर्यंत काही निवडक लोक आपले अनुभव कथन करतात. याची माहिती शरद कदम यांनी शरद पवार यांना दिली. "उपक्रम अत्यंत स्तूत्य असून सामाजिक एकोपा निर्माण होण्यासाठी फार महत्वाचा आहे, असे शरद पवार म्हणाले. या उपक्रमात या वर्षी मी सहभागी होईल, असेही ते म्हणाले". या उपक्रमात महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 


संविधान समता दिंडी पुणे ते पंढरपूर


गेली पाच वर्षे संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात संविधान समता दिंडी असते. संतांनी आपल्या अभंग, ओव्या, ग्रंथातून  समता, बंधूत्व, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य याचा जो विचार मांडला आहे,  त्यांचे प्रतिबिंब संविधानात उमटले आहे, हे संविधान कीर्तन-प्रवचनातून लोकांसमोर मांडले जाते. संविधान समता दिंडी ही पुण्यातून पंढरपुरपर्यंत जाते, अशी माहिती संविधान समता  दिंडीचे चालक ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर यांनी शरद पवार यांना दिली आहे.


हे ही वाचा :


माऊलींचे प्रस्थान तोंडावर, तरी इंद्रायणी फेसाळलेलीचं; संतापलेल्या वारकऱ्यांचा राजकीय नेत्यांना आळंदीत पाय न ठेऊ देण्याचा इशारा