एक्स्प्लोर

Pune Hospital Bomb Case: हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी अपडेट, आरोपीला नागपूर रेल्वे स्टेशनवर पकडलं; गुन्ह्याची कबुली दिली, प्लॅटफॉर्म 6 वर नेमकं काय घडलं?

Pune Hospital Bomb Case: पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब ठेवणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात महाराष्ट्र एटीएसला मोठे यश आले आहे.

Pune Hospital Bomb Case: पुण्यातील (Pune) हडपसर (Hadapsar) परिसरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब (IED) ठेवून संपूर्ण शहरात खळबळ उडवून देणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात महाराष्ट्र एटीएसला (दहशतवाद विरोधी पथक) मोठे यश आले आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर (Nagpur Railway Station) दबा धरून बसलेल्या एटीएसच्या पथकाने या आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

Pune Hospital Bomb Case: प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर थरारक कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी राठोड असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपी हा आझाद हिंद एक्सप्रेसने प्रवास करत होता. ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आली असता, तो गाडीतून उतरत असतानाच आधीच सज्ज असलेल्या एटीएसच्या पथकाने त्याला चहुबाजूंनी घेरून ताब्यात घेतले. सध्या या आरोपीला नागपूर एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

Pune Hospital Bomb Case: नेमके प्रकरण काय?

बुधवारी सायंकाळी पुण्यातील हडपसर परिसरातील कामधेनू इस्टेट येथे असलेल्या उषाकिरण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस, बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस), अग्निशमन दल आणि इतर सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ संशयास्पद वस्तू दिसून आल्याने नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी परिसर तातडीने सील करत नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले होते.

घटनास्थळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी आढावा घेतला. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी बॉम्ब वेळेतच निकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएस आणि आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) सारख्या केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या होत्या. या संवेदनशील प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले होते. संशयास्पद हालचालींवरून 15 ते 18 जणांची कसून चौकशीही करण्यात आली होती. अखेर तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीच्या चेहऱ्यावरून पडदा उठला आणि त्याचे लोकेशन नागपूरमध्ये ट्रॅक झाले. आरोपीला नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली असून, सध्या त्याला नागपूर एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आले आहे. तर आरोपीने नागपूर एटीएसला आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे.

आणखी वाचा 

NEET Paper Leak Case : स्वतः ला डॉक्टर म्हणून मिरवायचा, मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळायचा, सूत्रधार शुभम खैरनारचा धक्कादायक कारनामा उघड

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget