एक्स्प्लोर

Pune Crime: पुण्यातील नराधम बाबा ऋषिकेश वैद्यचा मोठा भाऊही खोटारडा निघाला, स्वत:ला वेदमूर्ती म्हणवायचा पण...

Pune Crime: सध्या चर्चेत असलेल्या पुण्यातील नराधम बाबा ऋषिकेश वैद्य याच्याविरोधात आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Pune Crime: नाशिकच्या भोंदू बाबाची चर्चा असतानाच  पुण्यात 'मी महादेवाचा अवतार' म्हणत महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका पाखंडी बाबाची सध्या एकच चर्चा आहे. स्वयंघोषित धर्म गुरु म्हणणाऱ्या ऋषिकेश वैद्य (Rushikesh Vaidya) या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली. नाशिकच्या अशोक खरात या प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात अंधश्रद्धेच्या बिळात लपलेल्या अनेक भोंदू बाबांचे कारनामे  उघडकीस येत आहेत.  दरम्यान सध्या चर्चेत असलेल्या पुण्यातील नराधम बाबा ऋषिकेश वैद्य याच्याविरोधात आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता या भोंदू बाबाचा मोठा भाऊही खोटारडाच निघाल्याचं समोर येतंय. (Pune crime)

ऋषिकेश वैद्यने एका मुलावर अत्याचार केल्याचा आरोप

सामाजिक कार्यकर्ते भूपेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 सालीच या भोंदू बाबाचे कारनामे उघड झाले होते. त्यावेळी एका मुलावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला होता. मात्र, समाजात बदनामी होईल या भीतीपोटी संबंधित मुलाच्या पालकांनी तक्रार मागे घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. तरीही वसईतील काही सामाजिक तरुणांनी या भोंदू बाबाविरोधात सोशल मीडियावर प्रखरपणे आवाज उठवत लिखाण केले होते.

ऋषिकेश वैद्यचा भाऊही खोटारडाच...

याच दरम्यान, आरोपीचे मोठे बंधू वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य हे पुरीच्या शंकराचार्यांचे शिष्य असल्याचा दावा करत असले तरी, भूपेश पाटील यांनी त्यावेळी संबंधित पीठाकडून माहिती घेतली असता असा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे सांगितले आहे.तसेच, सध्याच्या प्रकरणातील पीडित तरुणीही त्यावेळी भूपेश पाटील यांच्या संपर्कात आली होती. त्यांनी तिला पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिल्याचेही त्यांनी सांगितले.या दोन्ही बंधूंविषयी आणखी एक बाब समोर आली असून, घरगुती पूजा-अर्चा करण्याच्या नावाखाली 25 ते 40 हजार रुपये घेत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय? 

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती' असं सांगत महिलेला लॉजवर नेऊन ऋषिकेश वैद्य या स्वयंघोषित बाबाने महिलेला अमली पदार्थ देत तिच्यावर अत्याचार केला. महिलेने केलेल्या आरोपानुसार आरोपी तिला पुण्यातील मांजरी भागातील एका लॉज मध्ये घेऊन गेला होता. मादक पदार्थ देऊन नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपही महिलेने केला. त्यानंतर भोंदू बाबाने महिलेचे फोटो काढले होते. यासंबंधीत प्रकरणाची सुरुवात वसईत झाली होती. पुढील तपासासाठी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. पुणे पोलिसांनी तपास करत पिंपरी भागातून ऋषिकेश वैद्यला अटक केली. ऋषिकेश वैद्य विषयी अनेक खळबळजनक  खुलासे समोर येत आहेत.

दरम्यान, भूपेश पाटील यांनी आवाहन करत सांगितले की, “या भोंदू बाबा विरोधात सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवावा. कोणावरही अत्याचार झाला असेल तर निर्भीडपणे पुढे यावे. पोलिस आणि आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू.” तसेच, ‘आमची वसई’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आरोपी तरुण-तरुणींशी संपर्कात होता, त्यामुळे आणखी काही जण या प्रकाराला बळी पडले असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिस तपास अधिक व्यापक करण्यात येण्याची शक्यता असून, जुन्या प्रकरणांची ही चौकशी होऊ शकते.

 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget