एक्स्प्लोर

Pune Crime:पबजी खेळायचा नाद अन् पिस्तुलचा खेळ अंगाशी आला, खरी बंदुकीची गोळी सुटली अन् ..; पुण्यात नेमकं काय घडलं?

Pune Crime: या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरात तरुणांमध्ये वाढत असलेला बेजबाबदार शस्त्रप्रेम आणि  व्हिडीओ गेम्सचा प्रभाव उघड झाला आहे.

Pune Crime: मोबाईलवर ‘पब्जी ’ खेळण्याच्या नाद आणि मित्रांसमोर स्टाईल मारण्याचा हव्यास एका तरुणाला चांगलाच अंगाशी आलाय. पबजी खेळता खेळता तरुणानं आपल्या जमलेल्या मित्रांना खरीखुरी पिस्तूल लोड करून दाखवली. पिस्तूल लोड अनलोड करताना अचानक सुटली गोळी  आणि गोळीबारात ती मित्राच्या पायात घुसली अन तरुण गंभीर जखमी झालाय. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील उत्तमनगर भागात रविवारी (3 ऑगस्ट) रात्री उशिरा घडलाय. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय.

नेमकं घडलं काय? 

  उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर परिसरातील एका इमारतीमध्ये राहणाऱ्या पाच मित्रांचा ग्रुप रात्री एकत्र जमून ‘पबजी’ हा मोबाईल गेम खेळत होता. याचवेळी यातील एक तरुण त्याच्याकडे असलेलं पिस्तूल इतर मित्रांना दाखवू लागला. साधारण रात्री 1.30 च्या सुमारास, त्याने ते पिस्तूल लोड आणि अनलोड करत असताना अचानक पिस्तुलातून गोळी सुटली. अत्यंत जवळ बसलेले असल्यामुळे ही गोळी थेट समोर बसलेल्या मित्राच्या पायाच्या नडगीतून आरपार गेली. गोळी लागलेला तरुण तातडीने जखमी झाला. गोळीबार झाल्याचं लक्षात आल्यानंतर या पाचही तरुणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना ही घटना कळू नये म्हणून त्यांनी बनाव करण्याचा निर्णय घेतला.

घटना कळू नये म्हणून केला बनाव

जखमी तरुणाने पोलिसांना फोन करून त्याच्यावर अनोळखी व्यक्तीने गोळीबार केल्याची खोटी माहिती दिली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जेव्हा चौकशी सुरू केली तेव्हा त्यांच्या वागण्यात आणि उत्तरांत तफावत आढळली. संशय बळावल्यावर पोलिसांनी या तरुणांना खाक्या दाखवताच त्यांनी अखेर खरी घटना उघड केली.पोलिसांनी पिस्तूल जप्त केलं असून, ही शस्त्र कुठून आणली, याचा तपास सुरू आहे. या पाचही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. गोळी लागलेला तरुण सध्या उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरात तरुणांमध्ये वाढत असलेला बेजबाबदार शस्त्रप्रेम आणि  व्हिडीओ गेम्सचा प्रभाव उघड झाला आहे. फक्त खेळ म्हणून सुरुवात झालेल्या प्रसंगाचा शेवट रुग्णालयात झालाय. 

 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dominos Pizza Action : मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छ फ्रिज; डॉमिनोज पिझ्झाच्या 3 शाखांवर FDA ची मोठी कारवाई
मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छ फ्रिज; डॉमिनोज पिझ्झाच्या 3 शाखांवर FDA ची मोठी कारवाई
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
Embed widget