Maharashtra Pune Crime News : पुण्यात (Pune News) आता कुत्र्यापाठोपाठ म्हशीच्या रेडक्याशी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डेक्कन जिमखाना परिसरात एका 35 वर्षीय व्यक्तीने हे कृत्य केलं आहे. काही वाटसरुंनी हा प्रकार पाहिल्यावर घटनास्थळावरुन आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरीकांनी त्या आरोपीचा पाठलाग केला आणि त्याला नागरीकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत आरोपी बेशुद्ध पडला. आरोपीला सध्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोपी बरा झाल्यावर त्याला अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
आरोपीने म्हशीवर एका अंधाऱ्या, निर्जन ठिकाणी झाडाला बांधून लैंगिक अत्याचार केले. काही वाटसरूंनी म्हशीच्या रेडक्याचा रडण्याचा आवाज ऐकून त्याला पकडले. या प्रकरणी एका 28 वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार व्यक्ती नदीपात्रातील एका हॉटेलमध्ये कॉफी घेत होता. त्यावेळी त्याला एका अज्ञात व्यक्तीने नदीपात्रात म्हशीच्या रेडक्यासोबत अनैसर्गिक प्रकार घडत असल्याचं सांगितलं. त्यावेळी काही जणांनी या व्यक्तीला अनैसर्गिक कृत्य करताना पाहिलं. त्याचा पाठलाग करुन त्याला बेदम मारहाण केली आणि डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नदीपात्रात ज्या पुलाखाली ही घटना घडली, त्या ठिकाणी अंधार आहे आणि तिथे पथदिवे नाहीत. संभाजी उद्यानाच्या मागच्या बाजूने आरोपीने पळ काढला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुळचा नेपाळचा आहे. नदी पात्रातील नागरीकांना हा प्रकार घडत असताना दिसला. त्यांनी आरोपीच्या मागे पळत त्याला पकडलं आणि मारहाण केली. या भागात फार लाईट नाहीत आणि परिसरात माणसांची ये-जा नाही. त्यामुळे या आरोपीने रेडक्यावर लैंगिक अत्याचार केला. म्हशीच्या रेडक्याच्या आवाजाने आजूबाजूच्या लोकांनी पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुत्र्यावरही झाला होता लैंगिक अत्याचार
पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील 65 वर्षीय व्यक्तीने त्याच्या पाळीव कुत्र्यासोबतच अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलं होतं. भिवसेन टाकळकर असं त्या आरोपीचं नाव होतं. आरोपीने घरात एक कुत्री पाळली होती. घरातील दार बंद करुन हा आरोपी पाळीव मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करत होता. या प्रकरणी प्रतिक टाकळकर याने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. त्यावरुन त्याने आरोपीवर लक्ष ठेवलं होतं. त्याचे व्हिडीओ काढले होते. त्यासंदर्भातली तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.