पुणे : पुणे शहरात (Pune Crime News) मागील काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. पुण्यात कोयता गँगमार्फत दहशत पसरवण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे आता छोटे-छोटे वाददेखील जीवघेणे ठरू लागले आहेत. जवळपास दीड महिन्यापूर्वी झालेल्या एका वादातून टोळक्याने सापळा रचून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला केला असल्याची घटना घडली आहे. या दोन तरुणांवर हातोडी आणि स्क्रू ड्रायव्हरने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील नाना पेठेतील आज संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबेवाडी आणि धनकवडी भागात राहणारे दोन तरुण आज पुण्यातील नाना पेठेतील नातेवाईकांकडे आले होते. या दोन्ही तरुणांचे याआधी नाना पेठेतील काही तरुणांशी "एकमेकांकडे बघण्यावरुन" सुमारे दीड महिन्यापूर्वी वाद झाले होते. आज हे दोघे ही या भागात येत असल्याची माहिती संबंधित तरुणांना मिळाली. त्या भागात राहत असलेल्या तरुणांनी त्यांच्यावर ट्रॅप लावला (नजर ठेवली). ते दोघे ही एकत्र जेव्हा यातील एकाच्या नातावाईकांच्या घरातून बाहेर आल्यावर टोळक्याने संधी साधली. या टोळक्याने त्या दोघांवर हातोडी आणि स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला. या हल्ल्यात यातील एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला ससून रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
पुरंदरमधील रावडेवाडीत दोन गटात तुफान राडा, एकाचा खून तर तीन जण जखमी
पुणे (Pune) जिल्ह्याच्या पुरंदर (Purandar) तालुक्यातील रावडेवाडी इथे दोन गटात तुफान वाद झाला. या वादातून एकाचा खून (Murder) करण्यात आला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. शनिवारी, 30 सप्टेंबर रोजी ही घटना घडली.
वादाचं कारण अस्पष्ट
हा वाद नेमका काय आणि कशावरुन झाल याचे कारण अस्पष्ट आहे. पण या वादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या भांडणात सचिन दिलीप रावडे या 32 वर्षीय तरुणाचा जागेवर मृत्यू झाला. तर यश राजेंद्र रावडे, तानाजी निवृत्ती रावडे आणि ओमकार रावडे हे तिघे जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.