एक्स्प्लोर

Pune Crime News: 'बाहेर भेट, तुला संपवून टाकेन', लग्नाच्या मेहंदीत जोरदार राडा; दोन तरुणांना मारहाण करीत 5 लाखांची सोन्याची चैन लंपास, घटनेनं पुण्यात खळबळ

Pune Crime News: लग्नाच्या मेहंदी कार्यक्रमात डान्स करताना झालेल्या किरकोळ बाचाबाचीवरून एका टोळक्याने दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pune Crime News: लग्नाच्या मेहंदी कार्यक्रमात डान्स करताना झालेल्या किरकोळ बाचाबाचीवरून एका टोळक्याने दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी केवळ मारहाणच केली नाही, तर कोयत्याचा धाक दाखवून 5 लाख रुपये किमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना 27 एप्रिल रोजी रात्री 10 च्या सुमारास पुण्याच्या (Pune News) संगमवाडी परिसरात घडली.

Pune Crime News: नेमकी घटना काय?

फिर्यादी नंदू अर्जुन काची (व्यवसाय- पान शॉप) यांच्या नातेवाईकाचे लग्न असल्याने संगमवाडी येथील सुनिता काची यांच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फिर्यादी आणि त्यांचे मित्र गोपीनाथ चौर्य हे कार्यक्रमात साऊंड सिस्टिमवर डान्स करत असताना आरोपी संतोष काची तिथे कारमधून आला. थोडा वेळ डान्स केल्यानंतर संतोषने विनाकारण नंदू काची यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

Pune Crime News: जीवे मारण्याची धमकी आणि लूटमार

"तू मला बाहेर भेट, तुझ्यावर फायरिंग करून तुला जीवे ठार मारीन," अशी धमकी देत संतोषने नंदू यांचा शर्ट पकडून धक्काबुक्की केली. त्यानंतर त्याने आपला मुलगा यश काची आणि इतर साथीदारांना बोलावून घेतले. या टोळक्याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दहशत निर्माण करण्यासाठी संतोष काची याने कोयता हवेत फिरवला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये मोठी घबराट पसरली. याच गोंधळाचा फायदा घेत आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील 5 तोळ्यांची (किंमत 5 लाख रुपये) सोन्याची चैन हिसकावून पोबारा केला.

Pune Crime News: पाच आरोपींना अटक

याप्रकरणी नंदू काची यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे. संतोष काची (वय 45, रा. सांगवी), यश काची (वय 20, रा. सांगवी), दत्ता रघुनाथ चव्हाण (वय 37, रा. वारजे), सुशिल सूर्यकांत सर्वगौड (वय 43, रा. पाटील इस्टेट), यश दीपक सावंत (वय 23, रा. जुनी सांगवी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. लक्ष्मीनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, भरवस्तीत कोयता काढून दहशत माजवणाऱ्या या टोळक्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती

Maan Water Crisis: वयाची ऐंशी ओलांडली, शरीराने साथ सोडली, शासनाच्या योजनाही कागदावरच; घोटभर पाण्यासाठी वृद्धाची झुंज, स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतरही पाण्यासाठी संघर्षच?

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Crime News: मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Embed widget