एक्स्प्लोर

Pune Crime News: पुण्यातील नामांकित ILS लॉ कॉलेजमध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार, पाच तरुणांकडून 36 वर्षीय विद्यार्थ्याला शिवीगाळ अन्...; नेमकं काय घडलं?

Pune Crime News: शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील अत्यंत प्रतिष्ठित आयएलएस विधी महाविद्यालयात रॅगिंगचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे.

Pune Crime News: शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे (Pune) शहरातील अत्यंत प्रतिष्ठित आयएलएस विधी महाविद्यालयात (ILS Law College) रॅगिंगचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका 35 वर्षीय विद्यार्थ्याला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे महाविद्यालयीन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Crime News: नेमकी घटना काय?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी हा 35 वर्षांचा असून तो 'एलएलबी'च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. तो महाविद्यालयाच्या आवारातील मुलांच्या वसतिगृहात वास्तव्यास आहे. त्याच वसतिगृहात राहणाऱ्या आणि त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या पाच 20 वर्षीय विद्यार्थ्यांनी त्याला गेल्या काही काळापासून लक्ष्य केले होते. या विद्यार्थ्यांनी फिर्यादीला वारंवार शिवीगाळ करणे, अपमानास्पद वागणूक देणे आणि प्रचंड मानसिक त्रास देणे अशा प्रकारे रॅगिंग केल्याचा आरोप आहे.

Pune Crime News: पोलिसांची कारवाई 

संबंधित पीडित विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वी डेक्कन पोलीस ठाण्यात या छळाबाबत लेखी अर्ज दिला होता. पोलिसांनी या अर्जाची गांभीर्याने दखल घेत प्राथमिक चौकशी पूर्ण केली. चौकशीत तथ्यता आढळल्यानंतर पोलिसांनी आदित्य सिंह, सुमित गायकवाड, राजहंस देशमुख, स्वराज गायकवाड आणि उज्वल राज या पाच विद्यार्थ्यांवर महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News: महाविद्यालयाच्या भूमिकेकडे लक्ष

पीडित विद्यार्थ्याने या प्रकाराबाबत महाविद्यालय प्रशासनाकडेही तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने यावर नेमकी काय कारवाई केली, याची माहिती आता पोलीस घेत आहेत. रॅगिंग विरोधात कडक कायदे असतानाही नामांकित विधी महाविद्यालयात असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता हे पाचही विद्यार्थी कायद्याच्या कचाट्यात सापडले असून, महाविद्यालय त्यांच्यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ashok Kharat Nashik Crime News: ऑफिसमधील केबिननंतर आता अशोक खरातच्या फार्महाऊसमधील नको नको ते व्हिडीओ SIT च्या हाती; महिलांसोबत काय काय केलं, कूकने केला भांडाफोड!

Shivaji Kon Hota Book Controversy: संजय गायकवाडांच्या गुंडगिरीचा उलटा परिणाम; 'शिवाजी कोण होता?' 4 दिवसांत 10 हजार प्रतींची विक्री, पुस्तकाची छपाई पुन्हा सुरु

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळ्यात सर्वात मोठी अटक, भाजप पदाधिकाऱ्याला सोलापूरच्या फार्महाऊसमधून बेड्या
शालार्थ आयडी घोटाळ्यात सर्वात मोठी अटक, भाजप पदाधिकाऱ्याला सोलापूरच्या फार्महाऊसमधून बेड्या
Satara NEET exam death News: नीट परीक्षेचा निकाल आला, नैराश्यात गेली अन् उंदरांना मारण्याच्या विषारी वड्या खाल्ल्या; अचानक तीव्र पोटदुखी सुरू झाली, शेवटी...
नीट परीक्षेचा निकाल आला, नैराश्यात गेली अन् उंदरांना मारण्याच्या विषारी वड्या खाल्ल्या; अचानक तीव्र पोटदुखी सुरू झाली, शेवटी...
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं

व्हिडीओ

Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
Shetkari Karjmafi: कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ; यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेतही तफावत, शेतकऱ्यांचा संताप, नेमकी अडचण काय?
कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ; यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेतही तफावत, शेतकऱ्यांचा संताप, नेमकी अडचण काय?
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Yugendra Pawar on Ajit Pawar Death: आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
Embed widget