पुणे: पुणे शहरात मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध चारचारी BMW गाडी उभी करून अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाबाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. पुण्यातील भर चौकात लघुशंका करणार्या आणि अश्लील चाळे करणार्या गौरव आहुजा (Gaurav Ahuja) आणि त्याचे वडील मनोज आहुजा (Manoj Ahuja) या दोघांची पार्श्वभुमी गुन्हेगारी (Pune Crime News) स्वरुपाची असल्याचे पुढे आले आहे. आहुजा बापलेक हे जुगाराच्या धंद्यात सक्रीय राहीलेले आहे.
शिवाय पोकर गेम, क्रिकेट सामन्यांचे बेटींग घेणे आणि मटक्याचा व्यवसाय चालवणं, अशा वेगवेगळ्या स्वरुपाचे जुगाराशी संबंधित धंदे आहुजा बाप लेक करत आले असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यामुळे आहुजा बाप लेकांचे पाय आणखी खोलात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस (Pune Police) करत असून या प्रकरणी आता पोलीस नेमकी काय कारवाई करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आहुजा बाप-लेकाची पार्श्वभुमी गुन्हेगारी स्वरुपाची
पुढे आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मनोज आहुजा आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकेसाठी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, जुगाराच्या पैशातुन आहुजा बाप लेकांनी हॉटले व्यवसायात देखील गुंतवणुक केलीय. पुण्यातील स्वारगेट भागात आहुजा कुटुंबाच क्रीम एंड कीचन या नावाचं हॉटेल देखील आहे. गौरव आहुजाला दारुचे व्यसन तर आहेच, त्याचबरोबर तो आणखी कोणती नशा करतो का? याचाही पोलीस तपास करणार आहेत. येरवडा भागात अश्लील चाळे केल्यानंतर गौरव आहुजा त्याच्या मित्रासह फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेतायत.
क्रिकेटवर बेटींग घेणार्या टोळीचा सदस्य, अवघ्या 20 वर्षांचा गुन्हा
पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, गौरव आहुजा आणि त्याचे वडील मनोज आहुजा या दोघांची पार्श्वभुमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्यातूनच गौरव आहुजावर जुगार आणि अपहरणाचा गुन्हा पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात 2021 ला दाखल करण्यात आलाय. गौरव आहुजा हा त्यावेळी अवघ्या 20 वर्षांचा होता. मात्र क्रिकेटवर बेटींग घेणार्या टोळीचा तो सदस्य होता. पुण्यातील नामचीन गुंड सचिन पोटेच्या नेतृत्वात ही टोळी क्रिकेट सामन्यांवर बेटींग घेत होती. कॉलेजमध्ये शिकणारे तरुण ही टोळी बेटींगच्या सापळ्यात ओढत असे.
बेटींगच्या व्यसनामुळे अनेक कॉलेज तरुण कर्जबाजारी बनले होते. कर्ज फेडण्यासाठी या टोळीने त्या कॉलेज तरुणांना स्वतःच्या घरात चोरी करायला भाग पाडण्यात येत होतं. जे कॉलेज तरुण पैसे देत नव्हते त्यांच अपहरण करण्यात येत होतं. एका विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला असल्याची ही माहिती पुढे आली आहे.
हे ही वाचा