पुणे : पुण्यात सध्या बलात्काराचं आणि लैंगिक अत्याचाराचं प्रमाण (Pune Crime News) वाढलं आहे. त्यात शिक्षकीपेक्षाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय मुलीला शिक्षकानेच आय लव्ह यूचा मेसेज केल्याचा प्रकार समोर आला आहे.  त्यासोबत या मुलीला शिक्षकाने व्हिडीओ कॉल केल्याचंदेखील समोर आलं आहे. या प्रकारामुळे सगळीकडून शिक्षकावर संताप व्यक्त केला जात आहे.


या प्रकरणी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रमेश चव्हाण असं या शिक्षाकाचं नाव असून या शिक्षकाला अटकदेखील करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार कॉलेजमध्ये आणि कॉलेजमधून बाहेर पडल्यावरदेखील वारंवार घडला असल्याचं तक्रारीत म्हटलंय.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. याच महाविद्यालयात रमेश चव्हाण शिक्षक आहेत. या शिक्षकाने मुलीला वारंवार आय लव्ह यू असे मेसेज पाठवले. त्यानंतर तो शिक्षक एवढ्यावरच थांबला नाही तर तिला व्हिडीओ कॉलदेखील केला. त्यासोबतच भऱ महाविद्यालयाच्या स्टाफ रुममध्ये बोलवून चुंबन हवंय का?, अशी विचारणा केली. या सगळ्या प्रकारामुळे मुलगी संतापली आणि तिने थेट शिक्षकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीवरुन शिक्षकाला अटक केली आहे.


पुण्यात लैंगिक अत्याचारात वाढ


कालच पुणे एका घटनेमुळे हादरलं होतं. वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाणा करून 15 वर्षीय मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर दोन तरुणांनी  लैंगिक अत्याचार केला होता. पुण्यातील मांजरी परिसरातील नदीपात्रात ही घटना घडली होती. या घटनेमुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जात होता. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे अशी अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तरुण हे पीडित मुलीचे मित्र होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अनुराग व गणेश यांनी मुलीला फिरायला नेतो असे सांगून फिर्यादी यांच्या सोबत गाडीवर बसून मांजरी नदीपात्राच्या झाडीत नेलं. तिथे असलेल्या एकांताचा फायदा घेऊन अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे यांनी मुलीवर आळीपाळीने जबरदस्तीचे शारीरिक संबंध केले  आणि त्यानंतर मुलीला त्या निर्जनस्थळी सोडून निघून गेले.  याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.


इतर महत्वाची बातमी-


Sharad Mohol Case :  मोठी बातमी : अखेर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सापडला, गणेश मारणेला पाठलाग करत पकडलं!