Skin Care Tips : सूर्यप्रकाशाच्या हानिकारक किरणांपासून त्वचेची (Skin Care Tips) जर नीट काळजी घेतली नाही तर अनेकदा पेशींचं नुकसान होतं. या पेशींच्या नुकसानीमुळे तुम्हाला त्वचेशी संबंधित अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे त्वचा अधिक मेलेनिन तयार करू लागते. ज्यामुळे त्वचा काळी दिसू लागते. मेलेनिन हा एक प्रकारचा रंगद्रव्य आहे जो आपल्या त्वचेला आणि केसांना गडद तपकिरी आणि काळा रंग देतो. त्वचेमध्ये जास्त मेलेनिनमुळे टॅनिंगची समस्या उद्भवते.


डि-टॅन कसे करावे?


डी-टॅनसाठी कधीही कृत्रिम पद्धती वापरणं चुकीचं आहे. बाजारात अनेक उपचार उपलब्ध आहेत ज्यात रासायनिक स्प्रे, लाईट्स आणि इतर केमिकलचा वापर करून टॅनिंग काढले जाते. पण, या गोष्टींमुळे त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे टॅनिंग काढण्यासाठी कधीही कोणतेही उपकरण वापरू नका. तर, घरात असलेल्या काही वस्तूंचा वापर करून ते दूर करू शकता.


मध, दूध आणि हळद 


हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात ज्याचा वापर त्वचेचा रंग हलका करण्यासाठी केला जाऊ शकतो. दुधाच्या वापरामुळे त्वचा सुधारते आणि हानिकारक किरणांमुळे होणारे त्वचेचे नुकसान भरून काढण्यासही मदत होते. हे दोन्ही एकत्र लावल्याने त्वचा नैसर्गिकरित्या चमकते. हळद आणि दुधाचा फेस पॅक तयार करताना तुम्ही त्यात मधही टाकू शकता. यामुळे त्वचा मुलायम राहते.


मध आणि पपईचा फेसपॅक


टॅनिंग दूर करण्यासाठी हा पॅक सर्वोत्तम मानला जातो. पपईमध्ये असलेले एन्झाईम्स मृत पेशी काढून टाकून त्वचेवर चमक आणण्याचे काम करतात. याबरोबरच त्वचेवरील पिंपल्सचे डाग आणि डागही कमी होऊ शकतात. पपईमध्ये बीटा कॅरोटीन आढळते जे त्वचेला आर्द्रता प्रदान करते.


ग्रीन टी पॅक


अँटिऑक्सिडंट्सबरोबर ग्रीन टीमध्ये फ्लेव्होनॉइड्स देखील असतात जे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करतात. ग्रीन टी वापरून तुम्ही उन्हामुळे होणारे नुकसान, ठिपके आणि डाग कमी करू शकता. ग्रीन टी वापरून तुम्ही डोळ्यांखालील डार्क सर्कल्स देखील कमी करू शकता.


ग्रीन टी पॅक
अँटिऑक्सिडंट्ससोबत ग्रीन टीमध्ये फ्लेव्होनॉइड्स देखील असतात जे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करतात. ग्रीन टी वापरून तुम्ही उन्हामुळे होणारे नुकसान, ठिपके आणि डाग कमी करू शकता. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : सावधान! स्ट्रीट फूडमध्ये वारंवार वापरलं जाणारं तेल आरोग्यासाठी घातक; 'या' आजारांचा वाढता धोका