एक्स्प्लोर

पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, आम्ही इथले भाई म्हणत दोन भावांवर कोयत्याने हल्ला, दहशत पसरवू नका म्हणताच...

"ही दहशत पसरवू नका" असं सांगणाऱ्या स्थानिक व्यक्तीची सफारी गाडी हल्लेखोरांनी फोडली. या गाडीचे फोटोही समोर आले असून त्यावरून गुन्ह्याची गंभीरता स्पष्ट होते.

Pune Crime:पुण्यातील औंध परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने दहशत माजवली आहे. आम्ही इथले भाई आहोत, दुकान बंद करा, अशा शब्दांत धमकावत दोन भावांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. यासोबतच मोबाईल शॉपीच्या बाहेरची काच फोडून दहशतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं. एवढंच नाही तर या दहशतीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या एका व्यक्तीची सफारी गाडी फोडून त्याला लक्ष्य करण्यात आलं. या तिन्ही घटनांमुळे औंध परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं सावट पसरलं आहे. (Crime News)

हल्ल्याच्या सलग घटना

औंधमधील एका व्यापाऱ्याला आणि त्याच्या भावाला कोयत्याने मारहाण करण्यात आली. "दुकान बंद कर नाहीतर परिणाम भोगावे लागतील," अशी धमकी देत हल्लेखोरांनी परिसरात गोंधळ उडवला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी एका मोबाईल शॉपीच्या बाहेरील काच फोडली. याचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. दुसऱ्या घटनेत, "ही दहशत पसरवू नका" असं सांगणाऱ्या स्थानिक व्यक्तीची सफारी गाडी हल्लेखोरांनी फोडली. या गाडीचे फोटोही समोर आले असून त्यावरून गुन्ह्याची गंभीरता स्पष्ट होते.

पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह

औंधसारख्या व्यस्त आणि नागरी भागात कोयता गैंग इतक्या बेधडकपणे दहशत निर्माण करत असेल, तर पोलिस प्रशासन काय करतंय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. स्थानिकांनी पोलिसांना तातडीने या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना अटक करूनच या दहशतीवर नियंत्रण मिळवता येईल, असं नागरिकांचं म्हणणं आहे. औंध परिसरातील सलग घटना केवळ कायदा-सुव्यवस्थेलाच नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेलाही मोठं आव्हान निर्माण करत आहेत. दुकाने फोडणे, वाहने उद्ध्वस्त करणे आणि नागरिकांवर कोयत्याने हल्ले करणे या प्रकारांमुळे भीतीचं वातावरण वाढलं आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करून नागरिकांचा विश्वास परत मिळवणं गरजेचं आहे.

एकतर्फी प्रेमातून शेजारच्या तरुणीवर सपासप वार

शेजारी राहणाऱ्या तरुणीने प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून एकतर्फी प्रेम करणाऱ्या 24 वर्षीय शेजाऱ्यानं तिची हत्या केली. 23 वर्षीय तरुणीची भाजी कापण्याच्या सुऱ्याने तिच्या राहत्या घरातच 10 महिन्यापूर्वी गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची  धक्कादायक घटना समोर आली होती. यामधील खळबळजनक बाब म्हणजे मोठ्या बहिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या लहान  बहिणीलाही सुऱ्याने वार करून गंभीर जखमी केले होते. ही घटना भिवंडी शहरातील भादवड गावातील कानिफनाथ मंदिराजवळील  कृष्णानगरमधील शत्रुघ्न तरे चाळीत घडली होती. 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला, नाव विचारून छत्तीसगडच्या दोन मजुरांना संपवलं; 'लष्‍कर-ए-तैयबा'ने स्‍वीकारली भ्‍याड हल्‍ल्‍याची जबाबदारी
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला, नाव विचारून छत्तीसगडच्या दोन मजुरांना संपवलं; 'लष्‍कर-ए-तैयबा'ने स्‍वीकारली भ्‍याड हल्‍ल्‍याची जबाबदारी
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Embed widget