एक्स्प्लोर

Pune Crime: 'मी महादेवाचा अवतार' म्हणत महिलेवर अत्याचार; आणखी एका पाखंडी बाबा अटकेत; पुण्यात संतापाची लाट

Pune Crime:महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याच्याविरोधात पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Pune Crime: नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभारातून संतापाची लाट उसळली असताना पुण्यातून आणखी एका पाखंडी बाबाचा उद्योग समोर आलाय. मी महादेवाचा अवतार असं सांगत महिलेवर अत्याचार करणाऱ्या या स्वयंघोषित धर्मगुरु म्हणवणाऱ्या  ऋषिकेश वैद्य याला पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी परिसरातून ही कारवाई करण्यात आली. महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याच्याविरोधात पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune Crime News)

नेमके प्रकरण काय? Pune Crime

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणाची सुरुवात वसई येथे झाली होती. तेथील गुन्हा पुढील तपासासाठी पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी तपास करत पिंपरी भागातून ऋषिकेश वैद्यला ताब्यात घेतले.तो एका गाडीतून प्रवास करत त्यांच्या नातेवाईकांकडे पुण्यामध्ये येण्यासाठी निघाला होता त्याचवेळी पोलिसांना ही माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे..उद्या दुपारी ऋषिकेश वैद्य याला शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे. पुणे पोलिसांच्या तीन ते चार टीम त्याचा शोध घेत होते अखेर काही वेळापूर्वी त्याला पोलिसांनी अटक केली आहे..

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडितेचा आरोपी बाबाशी पहिला संपर्क 2023 मध्ये फेसबुकद्वारे झाला.त्याच वर्षी डिसेंबरमध्ये आरोपी त्या महिलेला भेटण्यासाठी पुण्यात गेला होता. त्याने आपण महादेवाचा अवतार असून ती त्याची 'पार्वती' असल्याचा दावा केला होता. पिडीत महिलेच्या आरोपानुसार,आरोपी तिला पुण्यातील मांजरी भागातील एका लॉजमध्ये घेऊन गेला, तिला काही मादक पदार्थ दिले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने त्या महिलेचे फोटोही काढले होते. तक्रारीनंतर पोलिसांनी भोंदू बाबावर गुन्हा दाखल केला. आता ऋषिकेश वैद्य या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अशोक खरात प्रकरणात रोज नवनवे खुलासे 

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात शुक्रवारी रात्री उशीरा दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा (Sexual Assault) तर दुसरा गुन्हा हा आर्थिक फसवणुकीचा आहे.  यापैकी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अशोक खरात याने संबंधित महिलेवर त्याच्या नेहमीच्या पद्धतीनेच म्हणजे दैवी अवतार असल्याचे सांगून आणि तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पती आणि पत्नी दोघेही (Married Couple) संसारात विघ्न येत असल्याने अशोक खरात याच्याकडे गेले होते. 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget