एक्स्प्लोर

पुणे अपघात; लेकासाठी ढसाढसा रडणारी आई बेपत्ता, पोलिस घरी पोहोचल्यावर मिळालं वेगळंच उत्तर

पोलिसांकडून एकीकडे कारवाईला जोर आला असताना दुसरीकडे अग्रवाल कुटुंब पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. अपघातातील अल्पवयीन मुलासह आरोपी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.

पुणे : शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात (Accident) प्रकरणात पोलीस (Police) कारवाई आणखी वेगाने होत आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी 10 पेक्षा जास्त जणांना याप्रकरणात अटक केली असून ससून रुग्णालयातील डॉक्टरांवरही कारवाई होत आहे. त्यातच, डॉ. अजय तावरेंचं निलंबन करण्यात आलं असून ससूनचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. आता, याप्रकरणी पोलिसांकडून मुलाच्या आईचीही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी, पोलिसांकडून शिवानी अग्रवाल यांची विचारपूस केली असता, त्या घरात नसून बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओनंतर तो व्हिडिओ माझ्या मुलाचा नाही, हे सांगताना ढसाढसा रडणाऱ्या शिवानी अग्रवाल कुठे गेल्या?, असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. 

पोलिसांकडून एकीकडे कारवाईला जोर आला असताना दुसरीकडे अग्रवाल कुटुंब पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. अपघातातील अल्पवयीन मुलासह आरोपी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर, आता पोलिसांकडून मुलाची आई शिवानी अग्रवाल यांची देखील चौकशी होणार असल्याचे समजते. त्यातच, आता शिवानी अग्रवाल बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रायव्हरला धमकूल्याप्रकरणी क्राइम ब्रांच टीमकडून शिवानी अग्रवाल यांचा देखील तपास करायचा आहे. त्यामुळे, पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेईल, या भीतीने त्या सध्या बेपत्ता आहेत. तर, शिवानी अग्रवाल यांचा फोन देखील बंद आहे. त्यामुळे, मुलाची आई व विशाल अग्रवाल यांच्या पत्नी नेमकं कुठं गायब झाल्या, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. 

पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईने त्यांचा ड्रायव्हर गंगाराम यास धमकवलं होतं का, याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांकडून त्यांच्या नातेवाईकांना आणि भावांना निरोप देण्यात आला आहे. शिवानी अग्रवाल जिथे कुठे असतील त्यांना पोलिसांशी संपर्क साधायला सांगा, असे पोलिसांनी म्हटले आहे. 

वडिलांनी डॉक्टरांशी 14 वेळा केला संपर्क

दरम्यान, पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी रोज नवे अपडेट समोर येत आहेत. अल्पवयीन मुलाच्या आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल यांच्याकडून ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरेंना 14 फोन कॉल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अजय तावरे ब्लड सॅम्पल बदलताना अल्पवयीन मुलाच्या वडिलांशी सातत्याने बोलत होता, हे स्पष्ट झालं आहे. त्यानंतर, अल्पवयीन आरोपी घटना घडली तेव्हा नशेत होता, हे सिद्ध होऊ नये यासाठी डॉक्टरांनी लाचेच्या लालसेपोटी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलेले असल्याचे समोर आल्यानंतर आता आरोपी डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले आहे.

हेही वाचा

रक्ताचे सॅम्पल कचऱ्यात फेकणारे अजय तावरे, श्रीहरी हरनोळ निलंबित; 'ससून'चे डीन विनायक काळे सुद्धा सक्तीच्या रजेवर

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला, अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
Vasai Crime : कोट्यवधी रूपये लाटण्याचा टाकला मोठा डाव, कंपनीच्या अध्यक्षानेच एमडींचा काटा काढण्याचा प्लॅन रचला अन्..., वसईतील धक्कादायक घटना
कोट्यवधी रूपये लाटण्याचा टाकला मोठा डाव, कंपनीच्या अध्यक्षानेच एमडींचा काटा काढण्याचा प्लॅन रचला अन्..., वसईतील धक्कादायक घटना
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Embed widget