Pradeep Purnekar Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट; आरोपींवर मोक्का लागण्याची शक्यता, ठाणे SIT मोठ्या कारवाईच्या तयारीत
Pradeep Purnekar Case: प्रदिप पुर्णेकर हत्या प्रकरणातील आरोपींवर आता कायद्याचा फास आवळला गेला असून आरोपींवर ठाणे SIT मोठ्या कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

Pradeep Purnekar Case ठाणे : ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रदिप पुर्णेकर हत्या प्रकरणातील आरोपींवर आता कायद्याचा फास आवळला गेला असून आरोपींवर ठाणे SIT मोठ्या कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या सोबतच ठाणे पोलिस आरोपींवर आता मोक्का (MCOCA) लावण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्या हत्येच्या प्रकरणात संघटित गुन्हेगारीचा ठपका ठेवत आरोपींवर त्या अनुषंगाने कलम लावण्याची शक्यता आहे.
Pradeep Purnekar Case: थंड डोक्याने, प्लानिंग अन् रेकी करुन एकत्रितपणे हत्या, आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
दरम्यान, थंड डोक्याने प्लानिंग करुन आणि रेकी करुन एकत्रित पणे पाच आरोपीनी प्रदिप पुर्णेकर यांची हत्या केली होती. हत्येकरता बंदूक चालण्याचे विशेष ट्रेनिंग, गाड्यांची जुळवा जुळव, हत्यारांची जुळवा-जुळव आरोपींनी केली, अशी देखील माहिती तपासातून पुढे आली आहे. यासह, आरोपींवर याआधी गंभीर गुन्हे असल्याने मोक्का अंतर्गत आरोपींवर ठाणे पोलिस मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे.
अशातच, सुभाष शिंदे उर्फ पप्या शिंदेवर 11 गुन्हे दाखल आहेत. यात धमकावणे, मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर नितेश पवार उर्फ भावड्यावर हत्येचा प्रयत्न आणि हत्या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत
Thane SIT News: किमान जन्मठेप आणि मृत्यूची शिक्षा होण्याची शक्यता
तर, संतोष टल्ली विरोधात दोन अदखलपात्र गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. यासह निखिल यादव आणि अमित सिंग पपलू यांच्यावर कोणताच गुन्हा दाखल नसल्याचे समोर आलं आहे. यानुसार आता ठाणे SIT पथकाने सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता केली असून लवकरच आरीपींवर मोक्का लावण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलिस वरीष्ठ सुत्रांनी दिलीये. यामुळे प्रदिप पुर्णेकर हत्या प्रकरणातील आरोपींवर आता लवकर जेल बाहेर येणे शक्य होणार नाही, तसंच किमान जन्मठेप आणि मृत्यूची शिक्षा आरोपींना होवू शकते, अशी देखील माहिती आहे.
ठाण्यात नेमकं काय घडलं? (Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case)
ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर दोन राऊंड गोळीबार झाला. गोळीबारामुळं पूर्णेकर जखमी झाल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान प्रदीप पूर्णेकर यांचा मृत्यू झाला. प्रदीप पूर्णेकर यांच्यावर मानपाडा या ठिकाणच्या त्यांच्या गणेश नगर येथील कार्यालयामध्ये हा प्राणघातक हल्ला झाला अशी माहिती आहे.






















