Pimpari Chinchwad Police News : आईची हत्या करण्याच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून बापाला अटक केल्यानंतर पोरकी झालेल्या चिमुकलीचा सांभाळ एका महिला पोलिसाने केला. त्या तीन वर्षीय मुलीचे आजी आजोबा येईपर्यंत पोलिसांनी पालकाची भूमिका बजावली. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी पोलीस स्टेशनमधील ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत. एमसीएचं शिक्षण अन् त्यानंतर नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या शिवम पचौरीच्या चुकीची शिक्षा या मुलीला भोगावी लागत आहे. दारूच्या नशेत केलेल्या भांडणात तो पत्नी अवंतिकाच्या जीवावर उठला. 


पत्नीचंही एमबीए पर्यंतच शिक्षण झालेलं. मात्र शिवम मानसिक दृष्ट्या अस्थिर झालेला होता. स्वतःच्या आई वडिलांशी ही तो भांडण करून आला होता. त्यांच्याशी संपर्क तोडल्यानंतर पत्नीशी दारुवरून खटके उडू लागले होते. यातून आलेला एकटेपणामुळं शिवम मानसिक तणावाखाली आला होता. अशातच 9 जूनला दारूच्या नशेत पुन्हा वाद झाला अन् तो मुलीच्या समोरच पत्नीला बेदम चोप दिला. भिंतीवर, किचन कट्ट्यावर डोकं आपटलं. नंतर गळा दाबला. दारूची नशी कमी झाली. तेव्हा शिवमला स्वतःची चूक लक्षात आली. 


रात्रीच्या वेळेत तब्बल दीड तास रुग्णवाहिका शोधू लागला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. शेवटी हिंजवडी पोलिसांना घडला प्रकार कळवला, त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. बापाची या चुकीची तीन वर्षांच्या चिमुकलीला अद्याप जाणिव नाही, पण आयुष्यभर तिच्या नशिबी ही एक शिक्षाच येऊन पडलेली आहे. क्षुल्लक कारणावरून पालक एखादा गुन्हा करून जातो, पण त्यांच्यामागे मुलाचे काय हाल होतील याचा विचार ही ते करत नाहीत. अशा पालकांनी ही दृश्य पाहावीत आणि स्वतःच्या रागावर नियंत्रण आणण्याचा धडा घ्यायला हवा.


इतर काही महत्वाच्या बातम्या