एक्स्प्लोर

Phaltan Doctor Death Case: डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; पीएसआय गोपाल बदने अन् प्रशांत बनकरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Phaltan Doctor Death Case : फलटण रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या संशयित आरोपींला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सोनवण्यात आली आहे.

Satara Phaltan Doctor Death Case: फलटणमधील (Phaltan) डॉक्टर महिलेच्या आत्महत्या (Phaltan Doctor Death Case) प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत, तर दुसरीकडे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये याप्रकरणात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या संशयित आरोपींची आज पोलीस कोठडी संपली. परिणामी त्यांना आज फलटण न्यायालयात हजर केले असता, त्यांना आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सोनवण्यात आली आहे. या दोघांना काही वेळातच सातारला हलवण्यात येणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे.

CM Fadnavis : 'महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SIT स्थापन करा',पोलीस महासंचालकांना थेट आदेश

फलटण (Phaltan) प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'फलटण प्रकरणी महिला आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी (SIT) गठीत करावी', असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. या प्रकरणामध्ये स्थानिक पोलीस (Police) अधिकाऱ्यांवर आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ही एसआयटी (SIT) स्थापन होणार असून, या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे. सरकार या प्रकरणी ॲक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

Phaltan Doctor Case: डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांशी राहुल गांधींचा फोनवरून संवाद

फलटणच्या डॉक्टर तरुणीचा आत्महत्येनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तरुणीचा कुटुंबीयांची भेट घेतली .यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला .राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबाकडून जाणून घेतली .या घटनेत आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीडित कुटुंबाकडून करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget