एक्स्प्लोर

PCMC Crime News : शाळकरी मुलांमध्ये राडा, एकावर चाकूने हल्ला, जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू

पिंपरी-चिंचवड-  विद्देचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये शाळेच्या पटांगणात एका विद्यार्थ्यांने दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या पोटात चाकूने भोसकले आहे.

पिंपरी-चिंचवड-  विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये  (Pune Crime news)शाळेच्या पटांगणात एका विद्यार्थ्यांने दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या पोटात चाकूने भोसकले आहे. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरी पोलिसांनी घटनेचा तपास करत सहा अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांना समजपत्र बजावले आहे. हे सर्व विद्यार्थी नववी आणि दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. ही घटना1 फेब्रुवारी रोजी घडली आहे. स्कुल बॅग फाटल्यावरू दोघांमध्ये वाद झाले होते. 

 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारीला ही सगळी घटना घडली. दुपारी साधारण साडे बारादरम्यान शाळेच्या आवारत ही घटना घडली. नववी आणि दहावीतील ही मुलं आहेत. दहाविची पुर्वपरिक्षा सध्या सुरु आहे. या दरम्यान एका मुलाने पटांगणात दुसऱ्या मुलाचं दफ्तर ओढलं त्यात मुलाचं दफ्तर फाटलं. यानंतर दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. मात्र यानंतर परिक्षा असल्याने दोघेही पेपर सोडवण्यासाठी वर्गात गेला. मात्र पेपर संपल्यानंतर या मुलांनी काटा काढला. ज्या मुलाने दप्तर ओढलं होतं. त्या मुलाने दोनचार मुलांना एकत्र करत मुलाला मारहाण केली. याच मुलांपैकी एकाने खिशात चाकू आणला होता. त्याने थेट चाकू काढून पोटात भोसकला. या सगळ्यात मुलगा जखमी झाला. यानंतर लगेच मुलाला दवाखान्यात भर्ती करण्यात आलं आणि पोलिसांनी तक्रार दाखल करुन 306 चा गुन्हा दाखल केला आहे. सगळे विद्यार्थी अल्पवयीन असल्याने या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आलेली नाही. 

 गुन्हेगारीत आता शाळकरी मुलं?

 
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली आहे. त्यात कोयते हल्ले, रस्त्यांवर हल्ले आणि मारहाण, दहशतीचे प्रकार सर्रास घडत आहे. या शहरातील गुन्हेगारीचा परिणाम शाळकरी मुलांवर दिसून येत आहे. त्यामुळे आता ही गुन्हेगारी वृत्ती थेट शाळेच्या पटांगणात दिसून येत आहे. शहरातील गुन्हेगारी आता शाळेत दिसू लागली आहे. 
 

पोलिसांसमोर मोठं आव्हान

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारीने कळस गाठला आहे. त्यातच पोलिसांकडून ही गुन्हेगारी थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मात्र गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही आहे. आता ही गुन्हेगारी शाळांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे ही गुन्हेगारी थांबवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. 
 
इतर महत्वाची बातमी-
 
 
 
 
 
 
 

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Pune Crime News: नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Embed widget