परभणी : राज्यात जन्माला येण्याच्या आधीच मुलींची भ्रूण हत्या होताय, मुलगी झाली म्हणून आईला जिवंत जाळलं जातंय, बदलापूर किंवा राज्यभरात लैंगिक अत्याचारांच्या घटना असतील, किंवा कालच तीन मुलींवर अत्याचाराची घटना असेल, या सगळ्या घटना प्रचंड चीड निर्माण करणाऱ्या आहेत. अशा गुन्हेगारांना कायद्याचं किंवा व्यवस्थेचं पाठबळ मिळत आहे. कायद्याचा वचक नावाची गोष्ट राज्यात शिल्लक राहिलेली नाही. परभणी येथील महिलेचा बळी नसून व्यवस्थेने केलेला खून आहे. असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तींना कायद्याचं पाठबळ मिळतं, त्यामुळे अशा घटना वाढल्या असल्याचा गंभीर आरोप भारत सरकारच्या राष्ट्रीय तपासणी आणि मूल्यमापन समिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सदस्य अॅड. वर्षा देशपांडे यांनी केला आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी महिला आयोगावरही सडकून टीका केली. महिला आयोग आपल्या दारी या फक्त फॅशनेबल गोष्टी केल्या जातात, असेही त्या म्हणल्या.
तिसरी ही मुलगीच झाल्याच्या रागातून संतापलेल्या पतीने माणुसकीला काळिमा फसणारे कृत्य केलंय. यात पतीने चक्क पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळल्याचा प्रकार परभणीती घडला आहे. या धक्कदायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, जीव वाचविण्यासाठी धावताना घरासह दोन दुकाने जळून खाक झाल्याची माहिती पुढे आली आहे.
परभणीतील महिलेचा बळी नसून व्यवस्थेने केलेला खून- अॅड. वर्षा देशपांडे
मिळालेल्या माहितीनुसार, तिसरी ही मुलगीच झाल्यामुळे पतीने आपल्या पत्नीचाचा डाव धरला. उठता बसता पत्नीला शिवीगाळ मारहाण करून तो तिच्याशी भांडायचा. गुरूवारी रात्री आठच्या दरम्यान पतीने कहरच केला. यात चक्क टोकाचे पाऊल उचलत पत्नी मैना कुंडलिक काळे हिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. ही घटना परभणीच्या गंगाखेड नाका परिसरातील घडली आहे. या घटनेचे वृत्त 'एबीपी माझा' ने लावून धरलं असता या संतापजनक घटनेवरुन संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत अशातच भारत सरकारच्या राष्ट्रीय तपासणी आणि मूल्यमापन समिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सदस्य अॅड. वर्षा देशपांडे यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं असून परभणी येथील महिलेचा बळी नसून व्यवस्थेने केलेला खून असल्याची टीका केली आहे.
हे ही वाचा