Parbhani Crime News: जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार करून गर्भवती करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने शिक्षा सुनावणी आहे. या आरोपीला परभणी प्रमुख जिल्हा (Parbhani District Court) व सत्र न्यायाधीश यु एम नंदेश्वर यांनी 20 वर्षे सश्रम कारावास व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपाचे नाव प्रल्हाद विठ्ठलराव हजारे (34) असं आहे. तो परभणी (Parbhani) तालुक्यातील लोहगाव येथे सालगडी येथील रहिवासी आहे.    


मिळालेल्या माहितीनुसार, मार्च 2021 मध्ये आरोपी प्रल्हाद विठ्ठलराव हजारे याने गावातीलच अल्पवयीन मुलीस उचलून नेले आणि तिला  जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले. आरोपी सतत मुलीवर अत्याचार करत होतो, त्यानंतर ती 4 महिन्याची गर्भवती झाली. याप्रकरणी ताडकळस पोलीस (Police) ठाण्यात पॉस्को कायद्यांअतर्गत (pocso act)  गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस (Police) अधिकारी राजेंद्र पाल यांनी केला. पोलिसांनी आरोपी प्रल्हाद विठ्ठलराव हजारे याला अटक केली. नंतर हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालया (Parbhani District Court) समोर चालले. या प्रकरणी सरकारी पक्षांचे वतीने 6 साक्षीदार तपासण्यात आले. यातील सर्व साक्ष पुराव्याचे अवलोकन झाल्यानंतर आज या प्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र (Parbhani District Court) न्यायाधीश यु. एम. नंदेश्वर यांनी नराधम आरोपी प्रल्हाद विठ्ठलराव हजारे यास कलम 4 पोक्सो कायदा (pocso act) अन्वये 20 वर्षे सश्रम कारावास व 25,000 दंड सुनावला. हा दंड पिडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दंड न भरल्यास 6 महिने साधा कारावास व कलम 506 भादंवि अन्वये 3 वर्षे सश्रम कारावास व 1,000 रुपये दंड आहे.


दरम्यान, एकूणच या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता अॅड ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी अभियोक्ता अॅड अभिलाषा पाचपोर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. तसेच आर. रागसुधा पोलीस (Police) अधीक्षक परभणी (Parbhani) व यशवंत काळे अपर पोलीस (Police) अधीक्षक परभणी Parbhani) यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सपोनि कपिल शेळके, पोउपनि सुरेश चव्हाण, कोर्ट पैरवी अंमलदार प्रमोद सुर्यवंशी, मपोह मिना दिवे, पुष्पा जवादे यांनी काम पाहिले.


इतर महत्वाची बातमी: 


Aurangabad Abortion Case: औरंगाबादच्या गर्भपात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; इंजेक्शनचा साठा परजिल्ह्यातून आला