Valentine Day Discount: जर तुम्हाला व्हॅलेंटाईन डे निमित्त तुमच्या पार्टनरला फोन गिफ्ट करायचा असेल तर फ्लिपकार्ट तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर घेऊन आले आहे. Flipkart वर Nothing Phone One आणि Nothing Ear stick वर जबरदस्त सूट दिली जात आहे. तुम्ही फक्त 26,999 रुपयांमध्ये नथिंग फोन 1 आणि 6,999 रुपयांमध्ये नथिंग इअर स्टिक खरेदी करू शकता. बाजारात या मोबाईल फोनची किंमत 38,000 रुपये आहे, तर नथिंग इअर स्टिकची किंमत 10,000 रुपये आहे. नथिंग फोन वन 128GB इंटरनल स्टोरेजसह येतो, ज्यामध्ये तुम्हाला 8GB RAM मिळते.


Nothing Phone One: मिळणार दमदार फीचर्स 


नथिंग फोन 1 मध्ये, ग्राहकांना 6.55-इंचाचा OLED डिस्प्ले मिळतो. जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या मोबाईल फोनमध्ये 4500 mAh बॅटरी उपलब्ध आहे. जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा मोबाईल फोन Qualcomm Snapdragon 778+ SoC द्वारे समर्थित आहे. 8/128GB, 8256GB आणि 12/256 GB स्टोरेज पर्यायांमध्ये फोन वन 3 स्टोरेज पर्याय उपलब्ध नाही. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला नथिंग फोन 1 च्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिसेल. ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा Sony IMX766 सेन्सर आणि दुसरा 50-मेगापिक्सेल Samsung JN1 सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. नथिंग फोन वनमध्ये कंपनी 3 वर्षांसाठी अँड्रॉइड सपोर्ट आणि 4 वर्षांसाठी दर 2 महिन्यांनी सेफ्टी अपडेट देईल.


फोनच्या समोरील बाजूस तुम्हाला 16 मेगापिक्सेल कॅमेरा मिळत आहे. नथिंग इअर स्टिकबद्दल बोलायचे झाले तर, हे सध्या 6,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही 29 तास या इअरबड्सवर गाणे ऐकू शकता. हे कानातही आरामात सेट होतात, असं कंपनीचं म्हणणं आहे. 


Nothing Phone One: येथे ही सुरू आहे मोठी सेल 


फ्लिपकार्ट व्यतिरिक्त विजय सेल्सने ग्राहकांसाठी 'व्हॅलेंटाईन डे सेल' आणला आहे, ज्या अंतर्गत वेगवेगळ्या उत्पादनांवर 70% पर्यंत सूट दिली जात आहे. स्मार्टफोन, हेडफोन, इअरबड्स, स्वयंपाकघरातील वस्तू, स्मार्ट टीव्ही, ऑडिओ सिस्टम इत्यादी अनेक गोष्टींवर तुम्हाला चांगली सूट मिळू शकते. या सेल अंतर्गत तुम्हाला निवडक बँकांच्या कार्डवर सूटही दिली जात आहे. व्हॅलेंटाईन डे सेल ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर देखील सुरू आहे. जिथे तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंवर 50% पर्यंत सूट मिळवू शकता.


इतर बातमी: 


Smartphone Launched This Week: कोका-कोला ते वनप्लस पर्यंत...या आठवड्यात लॉन्च झाले 'हे' पॉवरफुल स्मार्टफोन; पाहा संपूर्ण लिस्ट