एक्स्प्लोर

Pandharpur Vitthal Temple : धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Pandharpur Vitthal Temple Security : विठ्ठल मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात घडलेल्या या घटनेमुळे महिला भाविकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सोलापूर : अधिक मास सुरू झाल्याने देशभरातून हजारो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. या भाविकांमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि तरुणींचा समावेश आहे. त्याचवेळी मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात मोबाईलवर चोरून चित्रीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दोनच दिवसांपूर्वी अशाच स्वरूपाची घटना घडली होती आणि त्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा अशाच प्रकारची घटना समोर आल्याने पोलीस, मंदिर प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Pandharpur Temple Security : महिला स्वच्छतागृहात संशयास्पद हालचाल

एक महिला स्वच्छतागृहात गेली असता तिने एका तरुणाला भिंतीवर चढून मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करताना पाहिले. संबंधित महिलेनं आरडाओरड केल्यानंतर तो तरुण घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावून या प्रकाराची माहिती देण्यात आली.

Women Safety Pandharpur : महिला आणि लहान मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता

या स्वच्छतागृहांचा वापर देशभरातून येणाऱ्या महिला भाविक आणि पर्यटकांकडून केला जातो. अशा ठिकाणी चोरून चित्रीकरणाचे प्रकार घडू लागल्याने महिला आणि लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. संबंधित महिलांनी परिसरात काही तरुण अमली पदार्थ आणि मद्याचे सेवन करून वावरत असल्याचाही आरोप केला आहे.

Pandharpur Temple Administration : गंध लावणाऱ्या तरुणांवर संशय

मंदिर परिसरात गंध लावण्याचे काम करणाऱ्या काही तरुणांपैकीच एखादा या घटनेत सहभागी असू शकतो, अशी शंका संबंधित महिलेनं व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने या सर्वांची चौकशी करून जबाबदाऱ्या निश्चित करण्याची मागणी होत आहे.

Pandharpur Vitthal Temple : कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

या गंभीर प्रकारानंतर सामाजिक कार्यकर्ते विक्रम शिरसाट यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना न केल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

काही दिवसांपूर्वी पंढरपुरात असाच प्रकार घडला होता. भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपातील स्वच्छतागृहात चक्क दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आणि गुटखा-मावाच्या पुड्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर आता महिलांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

ही बातमी वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Pune Crime News: नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Embed widget