एक्स्प्लोर

धक्कादायक! विठोबाच्या पंढरीत अल्पवयीन हातात गावठी पिस्तूलासह जिवंत काडतूसं! खून करण्यासाठी निघाले तेवढ्यात..

Solapur Crime: यातील दोन आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

Solapur Crime: पंढरपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.  पंढरपूर शहरातील न्यायालय परिसरात दोन अल्पवयीन मुलं दोन पिस्टल आणि जिवंत काडतूसांसह पोलिसांना सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. एका इसमाचा खून करण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांमधील हे दोन आरोपी असल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र यात दोन अल्पवयीन मुले गावठी पिस्टलसह आढळल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Crime News)

नक्की झाले काय?

एका इसमाचा खून करण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांमधील दोन अल्पवयीन आरोपींना शहर पोलिसांनी सापळा रचून पकडल्याचे समोर आले आहे . ताब्यात घेतलेल्या दोघांकडे प्रत्येकी एक लोखंडी देशी बनावटीचे  पिस्टल, दोन मॅग्झीन व चार जिवंत काडतूस सापडली आहेत. या गुन्ह्यावेळी पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेल्या इतरांमध्ये यश अंकुशराव (रा. कोळी गल्ली), गोपाळ अंकुशराव ( रा.पंढरपूर) यांचा समावेश असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

याबाबत शहर पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जुना कासेगाव रोड येथे मोटार सायकलीवरून येत असताना, पोलिसांनी गराडा घालुन दोन अल्पवयीन आरोपींना जागीच पकडले. यातील दुसरी पोचले  दुसऱ्या मोटार सायकलीवरुन येत होते, परंतु पोलिसांना पाहून पळून गेले. त्यांमध्ये यश अंकुशराव, गोपाळ अंकुशराव असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

पोलिसांचा तपास सुरु

पकडलेल्या अल्पवयीनांकडे पिस्टल वापरण्याचा परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यास पंढरपूर शहर पोलिस ठाण्यास आणून भारतीय हत्यार कायदा चे 1959 कलम-3, 25, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 61 (2) तसेच मुंबई पोलिस अधिनियम कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत घुगरकर, पोसई महादेव पिसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत. यातील दोन अल्पवयीन व दोन सज्ञान कोणाच्या हत्ये साठी आले होते याचा तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा:

Pune Crime News: पुण्यात दुचाकीवरील मृतदेहाचं गूढ उलगडलं! बापाची पैशाची मागणी, सूनेचा विरोध, कडाक्याचं भांडण अन् जीवन संपवण्याचा प्रयत्न, राकेशनं बबीताला का मारलं?

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
Digital Arrest : आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Embed widget