नागपूरः मोबाईल अॅपच्या माध्यमातून 'इन्स्टंट लोन' देण्याच्या बहाण्याने तरुणांना टार्गेट करण्यात येत आहे. यात देशभरातील अनेक घटना उघडकीस आल्यास असून यापैकी बदनामीच्या बहाण्याने काहींनी आत्महत्याही केली आहे. मात्र या 'इन्स्टंट लोन' अॅपचे कनेक्शन थेट चीन सोबत असल्याचा खुलासा पोलिस उपायुक्त नुरुल हसन यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.


मुलीची कॉलगर्ल म्हणून बदनामी


कैफ इब्राहिम सय्यद (वय 25 रा. सोमवार पेठ, कऱ्हाड), ईरशाद ईस्माईल शेख (वय 32. रा. दापोडी, पुणे) अशी आरोपींनची नावे आहेत. अजनी पोलिस ठाण्यात 21 वर्षीय तरुणीने जानेवारीत फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. यामध्ये एका लिंकच्या माध्यमातून तिने लोनसाठी अर्ज केला. त्यासाठी त्यांना पॅन क्रमांक आणि फोटो आयडी दिला. काही वेळातच तिच्या खात्यात 1 हजार 200 रुपये जमा झाले. मात्र, काही दिवसात तिला फोनवरुन तिला 5 हजार 400 रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. तसेच न केल्यास तिचे अश्लील फोटो टाकून आणि कॉलगर्ल असल्याची माहिती देण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे युवतीने पैसे टाकले.


Nagpur : मुलांकडून 90 वर्षीय पित्याचा छळ, न्यायासाठी निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाची धडपड


वसूल रकमेच्या 3 टक्के कमिशन


यानंतर पुन्हा 7 हजार 800 रुपये एका क्रमांकावरुन मागण्यात आले. तेही दिल्यानंतर या युवतीचे फोटो आणि कॉलगर्ल म्हणून क्रमांक नातेवाईक आणि इतरांना पाठविण्यात आले. त्यातून नातेवाईकांनी अजनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. दरम्यान या प्रकरणाचा तपास करीत असताना, अनेक तांत्रिक बाबी तपासून आणि बँकेचा मदत घेतली असता, त्यात कऱ्हाड येतील दोन युवकांकडून हे काम करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यांना पथकाने ताब्यात घेत चौकशी केली असता, त्यातून अनेक खुलासे झाले. विशेष म्हणजे दोन युवकांच्या खात्यात प्रत्येकी 27 लाख रुपये आढळले. त्यांना याबाबत विचारणा केली असता, वसूल रकमेच्या 3 टक्के कमिशनवर काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.


Nagpur Crime : शहरात धाडसी चोरी, मुख्य मार्गावरील स्टेट बँकेचे एटीएम न फोडता रक्कम लंपास


विदेशातील व्हॉट्सअॅप क्रमांक


अटक करण्यात आलेल्या दोघांकडे हॉंगकॉंग, चायना, दुबई, फिलिपिन्स येथील असल्याची बाब समोर आली. त्यामुळे या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता असल्याची माहिती उपायुक्त नुरुल हसन यांनी दिली. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरीन दुर्गे आणि सहायक पोलिस निरीक्षक शेळके उपस्थित होते. यावेळी असा तक्रारी असल्यास अजनी पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.


सायबर सेलकडून तक्रार घेण्यासही नकार


काही दिवसांपूर्वी हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंटेरिअर डिझानिंगचे काम करणाऱ्या तरुणीसोबतही असे घटले होते. त्यावेळी तरुणीने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता तिला पोलिसांच्या सायबर सेलकडे पाठविण्यात आले. तरुणी सायबर सेलकडे गेली असताना तिची तक्रार न घेता. तुम्ही वेबसाईटवरुन तक्रार करा आम्ही आता तुमचा डेटा हॅकरकडे गेल्यामुळे काहीच करु शकत नाही असे उत्तर सायबर सेलमधील मदत कक्षातील कर्मचाऱ्याने देत तरुणीची तक्रार घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे असे अनेक प्रकरण घडत असताना पोलिसांचे त्यांना सहकार्य मिळत नसल्याचीही सत्यता आहे.