एक्स्प्लोर

Nida Khan: किराणापासून चिकनपर्यंत...सगळं घरपोच मिळायचं, 43 दिवस अंडरग्राउंड असताना निदा खानची सगळी सोय कोण करायचं?

Nida Khan: नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिने 43 दिवस पोलिसांना गुंगारा दिला होता. मात्र पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या ठोकल्या.

Nida Khan: नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान (Nida Khan) हिने तब्बल 43 दिवस पोलिसांना गुंगारा दिला. मात्र, नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) अत्यंत गोपनीय पद्धतीने मोहीम राबवून तिला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या ठोकल्या आहेत. नाशिकच्या भद्रकालीतील घास बाजार भागात जळाऊ लाकडे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या सामान्य कुटुंबातील निदा खान इतके दिवस फरार कशी राहिली? तिला कोणी आर्थिक आणि लॉजिस्टिक रसद पुरवली? याबाबत आता एसआयटी तपास माहिती समोर येत आहे.

Nida Khan: 43 दिवसांचा थरार आणि नगरसेवकाचे कनेक्शन

तपासानुसार, 23 मार्च रोजी भिवंडीतून बेपत्ता झालेली निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव भागात एका फ्लॅटमध्ये लपून बसली होती. धक्कादायक बाब म्हणजे, हे घर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या काळात निदा आणि तिच्या कुटुंबाला किराणा, चिकन आणि इतर दैनंदिन वस्तू पुरवण्याचे काम नगरसेवकाच्या ड्रायव्हरमार्फत केले जात असल्याचा संशय आहे.

Nida Khan: पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीने एक मोहीम राबवली. नाशिक पासिंगच्या वाहनांमुळे संशय येऊ नये, म्हणून पोलिसांनी इतर जिल्ह्यांच्या खाजगी वाहनांचा वापर केला. गुन्हे शाखा युनिट-1 चे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि त्यांचे पथक साध्या वेशात तीन दिवस नारेगाव परिसरात वास्तव्यास होते. स्थानिक खबऱ्यांना किंवा नगरसेवकाच्या समर्थकांना सुगावा लागू नये, यासाठी पोलिसांनी 'मोबाईल लोकेशन' पेक्षा मानवी गुप्तचरांवर अधिक भर दिला होता. पोलिसांनी 7 मे रोजी तिला अत्यंत शिताफीने अटक केली होती.

Nida Khan: आश्रय देणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार?

तपास यंत्रणांच्या मते, फरार आरोपीला माहिती असूनही आश्रय देणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. निदा खानला 43 दिवस लपवून ठेवण्याचा खर्च कोणी केला? यामागे एखादे मोठे नेटवर्क आहे का? याचा तपास आता सुरू झाला आहे. एसआयटीने आता नगरसेवक मतीन पटेल, त्यांचा ड्रायव्हर आणि निदाच्या काही नातेवाईकांची माहिती गोळा केली असून, लवकरच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. केवळ निदा खानच नाही, तर या प्रकरणामागे तिला रसद पुरवणारे खरे 'मास्टरमाईंड' कोण आहेत, याचा छडा लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. निदा खानच्या अटकेमुळे आता या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आणखी वाचा 

AIMIM Matin Patel: निदा खानला लपवणं अंगलट; फ्लॅट, घर, ऑफीसला अतिक्रमणाचा नोटीस, मतीन पटेलांचं आता नगरसेवकपदही जाणार? महापौरांनी दिली मोठी माहिती

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! नागपुरातून तब्बल दीड कोटी रुपयांची इलेक्ट्रिक बस चोरीला, अमरावतीत चोरट्याला पकडले, आत्तापर्यंत 20 बस चोरल्याची कबुली 
धक्कादायक! नागपुरातून तब्बल दीड कोटी रुपयांची इलेक्ट्रिक बस चोरीला, अमरावतीत चोरट्याला पकडले, आत्तापर्यंत 20 बस चोरल्याची कबुली 
अहिल्यानगरमध्ये भरदिवसा गॅंगवॉर, तरुणावर जीवघेणा हल्ला, तर पुणे गोळीबार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख पोलिसांच्या ताब्यात
अहिल्यानगरमध्ये भरदिवसा गॅंगवॉर, तरुणावर जीवघेणा हल्ला, तर पुणे गोळीबार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख पोलिसांच्या ताब्यात
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget