एक्स्प्लोर

मोठी बातमी : पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची केली प्रेग्नन्सी टेस्ट, रिपोर्टही समोर

nida khan pregnancy test : निदा खानने काही दिवसांपूर्वी मुंब्रामधील डॉक्टरांशी उपचाराबाबत मदत घेतल्याचे समोर आले होते. आता ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात आली आहे.

नाशिक : नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर, लैंगिक शोषण आणि मानसिक छळ प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान (Nida Khan) हिच्या 40 दिवसांच्या लपाछपीनंतर ती अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. नाशिक (Nashik) आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पोलिसांनी राबवलेल्या एका अत्यंत गुप्त आणि वेगवान मोहिमेत निदा खानला छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या. तिने अटकपूर्व जामिनासाठी आधीच हालचाली करत अर्ज देखील केला होता. मात्र, कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला. याच दरम्यान ती गरोदर असल्याची माहिती समोर आली होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.  निदा खान फरार होती. याच दरम्यान ती गरोदर असल्याची माहिती समोर आली होती. त्यासाठी तिने मुंब्रामधील डॉक्टरांशी उपचाराबाबत मदत घेतल्याचे समोर आले होते. आता ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात आली आहे. 

Nashik TCS Case Nida Khan Arrested: निदा खानची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटीव्ह

यामध्ये निदा खान 2 महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची UPT (युरिन प्रेग्नंसी टेस्ट) केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. टेस्टमध्ये निदा खान गरोदर असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती आहे. थोड्याच वेळात निदा खानला करणार न्यायालयात हजर केलं जाणार आहे.  तर TCS प्रकरणातील संशयित महिला आरोपी निदा खानचे आई वडील आणि मावशीही नाशिक पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. निदा खान सोबत तिचे आई वडील आणि मावशी देखील राहत असल्याने त्यांची चौकशी केल्याची सुरू असल्याची माहिती आहे.  निदा खानला आज नाशिक रोड कोर्टात हजर केले जाणार आहे, निदा खानला मदत करणाऱ्यांची देखील SIT कडून चौकशी सुरू आहे, निदा खानला मदत करणारा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलवर देखील निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

Nashik TCS Case Nida Khan Arrested: निदा खानने लपण्यासाठी खास लोकेशन निवडलं

निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कौसर कॉलनी निवडली होती. हे लोकेशन इतकं खास होतं की, ज्या इमारतीत ती लपली होती, तिच्या आजूबाजूला लांबलांबपर्यंत एकही घर नव्हतं. वर्दळ नसलेला आणि निर्जन भाग असल्याने कोणाला संशय येण्याची शक्यताच नव्हती. निदाला वाटले होते की या एकाकी भागात ती पोलिसांच्या नजरेतून सुरक्षित राहील, मात्र पोलिसांनी तिचा हा भ्रम तोडला.

Nashik TCS Case Nida Khan Arrested: दोन दिवस पोलिसांचा 'वॉच' अन् छापा!

निदा खान आपल्या कुटुंबासह (आई, वडील, भाऊ आणि आत्या) नारेगावच्या एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास होती. नाशिक एसआयटीला (SIT) तांत्रिक तपासाद्वारे ती संभाजीनगरमध्ये असल्याची खात्री पटली होती. पोलिसांनी सलग दोन दिवस त्या इमारतीवर लांबून नजर ठेवली. जेव्हा ती फ्लॅटमध्येच असल्याची खात्री पटली, तेव्हा नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री छापा टाकून तिला बेड्या ठोकल्या.

Nashik TCS Case Nida Khan Arrested: जामीन फेटाळला अन् 'गेम' उलटला

निदा खानने स्वतःला गरोदर असल्याचे सांगत आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, नाशिक जिल्हा न्यायालयाने हे प्रकरण केवळ वैयक्तिक वाद नसून एका 'आंतरराष्ट्रीय सिंडिकेट'चा भाग असल्याचे निरीक्षण नोंदवत तिचा जामीन वारंवार फेटाळला. जामीन फेटाळल्याच्या तीनच दिवसांत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. आता निदा खानच्या अटकेनंतर नाशिक धर्मांतर प्रकरणात आणखी काय धक्कादायक माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Nashik TCS Case: धर्मांतरण प्रकरणात दोन आरोपी आज पुन्हा न्यायालयात

नाशिकमधील TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांना पुढील गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयीन कोठडीतून पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई नाका पोलिसांकडून दोघांची चौकशी सुरू असून, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पीडितेच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही दोघांवर आहे. तसेच फिर्यादीला दिलेल्या गुंगीकारक पदार्थाचा स्रोत, बँक व्यवहार आणि फंडिंग याबाबतही पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget