Mumbai Crime News : मुंबई एनसीबीने (NCB ) मोठी कारवाई केली आहे. 20 कोटी रुपयांचे  2.800 ग्रॅम कोकेन जप्त केले असून बुटामध्ये लपवून कोकेनची तस्करी करणाऱ्या दोन महिलांना एनसीबीने अटक केली आहे. मरिंडा एस असे अटक करण्यात आलेल्या एका संशयित महिलेचे नाव आहे. मरिंडा आणि आणखी एक महिला दक्षिण आफ्रिकेवरून आल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या आकाराच्या आठ पॅकेटमधून हे कोकेन आणण्यात आले होते. यासाठी दोन जोड्यांच्या शूजमध्ये आणि दोन पर्समध्ये विशेष पोकळी तयार करून अतिशय काळजीपूर्वक हे कोकेन लपवले होते. परंतु, पोलिसांनी सतर्क राहून कोकेन तस्करीचा प्लान उधळून लावला. 


एनसीबीने जप्त केलेले कोकेन दक्षिण अमेरिकेतून आणले होते. मुंबई, गोवा आणि नजीकच्या भागात आगामी सणासुदीच्या काळात ड्रग्जचा पुरवठा करू इच्छिणाऱ्या स्थानिक ड्रग्ज तस्करांकडून याला जास्त मागणी आहे. 


मुंबईतील एनसीबी अधिकार्‍यांना माहिती मिळाली की, 20 नोव्हेंबर रोजी इथिओपियाची राजधानी आदिस अबाबा येथून मुंबईला एक विमान येणार होते. यातून कोकेनची तस्करी करण्यात येत आहे.  मिलालेल्या माहितीनुसार मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ मुंबई विमानतळावर धाव घेत संबंधित महिलेला पकडण्यासाठी सापळा रचला.  अदीस अबाबाहून आलेले विमान मुंबई विमानतळावर पोहोचताच त्या महिलेला पोलिसांच्या पथकाकडून अडवण्यात आले. यावेळी तिची झडती घेण्यात आली. त्यावेळी तिच्या साहित्यातून 2.800 किलो उत्तम दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आले. हे कोकेन संशयास्पद वस्तूंमध्ये काळजीपूर्वक लपवून ठेवले होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरिंडा एस नावाची दक्षिण आफ्रिकन महिला विमानतळावर पकडली गेली. अधिक चौकशीत तिने हे कोकेन मुंबईतील एच. मुसा या नायजेरियन नागरिकाला पुरवले जाणार असल्याचे उघड झाले. अटक करण्यात आलेल्या महिलांची स्थानिक आणि ऑफशोअर देशांमध्ये असलेल्या किंगपिनबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी चौकशी केली जात आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक अमित घावटे यांनी दिली.  


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अनेक संशयितांवर कारवाई केली जात आहे. एनसीबीकडून अनेक ठिकाणी छापेमारी करून अंमली पदार्थांच्या तस्करीचा भांडाफोड केला जात आहे. 3 ऑक्टोंबर रोजी मुंबई विमानतळावर कस्टमच्या पथकाने 9.8 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले होते. 


महत्वाच्या बातम्या


Shraddha Murder Case : रागाच्या भरात आफताबने श्रद्धाची हत्या केली, मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्लानसाठी घालवली अख्खी रात्र