Shraddha Murder Case : दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आफताबने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली आणि नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला. आफताब अमीन पूनावाला याने पोलिसांना सांगितले की, श्रद्धाचा मृतदेह पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमधून काढणे धोक्याचे होते. त्यामुले त्याने मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्याचा निर्णय घेतला.
गेल्या मे महिन्यात दक्षिण दिल्लीतील छतरपूर पहारी भागात भाड्याने फ्लॅट घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच दोघांमध्ये वाद झाला. वादानंतर आफताबने ही हत्या केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमधील वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात त्याने श्रद्धाला बेडवर फेकले आणि छातीवर बसून तिचा गळा दाबून खून केला. श्रद्धाचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर असल्याचा संशय आरोपींला होता.
हत्येनंतर बनवला प्लान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हत्येनंतर आफताबने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. मृतदेहाचे मध्यरात्रीनंतर तुकडे करणे, श्रद्धाचे सोशल मीडिया खाते सक्रिय ठेवणे या सर्व गोष्टींचा त्याने प्लान केला. हत्येनंतर0 मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याच्या नियोजनात त्याने रात्रभर घालवली. डेक्सटरसह त्याने टीव्ही शोमध्ये पाहिलेले सर्व काही त्याला आठवते आणि त्यानुसार प्लान केला.
हत्येनंतर 19 मे रोजी सकाळी 10 वाजता आफताब जवळच्या बाजारपेठेतून श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी हॅकसॉ आणि तीन मेटल कटिंग ब्लेडची खरेदी केली. त्याने काळ्या प्लास्टिकच्या कचऱ्याच्या पिशव्या देखील विकत घेतल्या. त्यानंतर त्याने शरीराचे अवयव कसे जतन केले जातात हे शोधून काढले. आफताबने दुकानातून 19,000 रुपयांना रेफ्रिजरेटर खरेदी केले.
आवाज येऊ नये म्हणून पाण्याचा नळ चालू ठेवत असे
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, नाल्यात रक्त वाहून जावे आणि शरीर कापताना आवाज शेजाऱ्यांपर्यंत जाणार नाही यासठी तो घरातील पाण्याचे नळ चालू ठेवत असे. 21 मे रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास त्याने शरीराचे काही तुकडे बॅगमध्ये भरले आणि सुमारे एक किलोमीटर फिरून त्याने छतरपूर टेकडीच्या स्मशानभूमीजवळील जंगलात मृतदेह फेकून दिला. मृतदेहासोबतची कचऱ्याची पिशवी त्याने फेकली नाही. त्याऐवजी, त्याने आपल्या फ्लॅटवर परत येताना बॅग डस्टबिनमध्ये फेकून दिली.
महत्वाच्या बातम्या